Maize Management agrowon
ॲग्रो विशेष

Maize Management : 'मक्याच्या अधिक उत्पादनासाठी संतुलित खत व्यवस्थापन महत्वाचे'

Maize Fertilizer Management : सध्या मका पिकाचे महत्त्व वाढत आहे. परंपरागत मक्का शेतीमुळे मक्याचे उत्पादन कमी झालेले दिसत आहे.

sandeep Shirguppe

Production of Maize : दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्रात वापर वाढल्याने मका पिकाचे महत्त्व वाढत आहे. परंपरागत मक्का शेतीमुळे मक्याचे उत्पादन कमी झालेले दिसत आहे. बदलत्या हवामानामुळे पारंपरिक तंत्रज्ञान कालबाह्य झाले आहे.

यामुळे मक्याच्या अधिक उत्पादनासाठी उत्पादकांनी संतुलित खत व्यवस्थापन करावे, असे प्रतिपादन मक्का संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुनील कराड यांनी केले.

किसरूळ (ता. पन्हाळा) येथे शेतकरी मेळावा व मक्का आद्यरेखा प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. कराड म्हणाले, "महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या अधिनस्त कसबा बावडा, कोल्हापूर येधील मका संशोधन केंद्राने मका संशोधनात भरीव कामगिरी करून मक्याच्या उत्कृष्ट वाणांची निर्मिती केली आहे.

मक्यामध्ये विविध संशोधन शिफारसी विकसित करून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढविण्यास मदत केली आहे. संशोधन प्रकल्पांतर्गत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मका पीक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार केला."

डॉ. सुहास भिंगारदेवे यांनी अखिल भारतीय अनुसंधान परिषद, गका संशोधन संस्था, लुधियाना यांनी मका आद्यरेखा प्रात्यक्षिक कार्यक्रमास १०० टक्के अनुदान दिल्याचे सांगितले.

यावेळी ५० लाभार्थी उत्पादकांना २ भारतीय मक्का संशोधन संस्था यांनी शिफारस केलेले मका हायब्रीड बायो ९५४४ बियाणे व इतर निविष्ठाचे मोफत वाटप झाले, यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य कृत्रिभूषण सर्जेराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, धनाजी शिरगावे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशांत महाडिक, धनाजी शिरगावे व सागर शेळके आदींनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT