Bajari Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Bajara Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच

Rabbi Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच आहे. यंदा क्षेत्र किंचित वाढू शकते. अनेकांनी कांदा व मका लागवड कमी केली आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच आहे. यंदा क्षेत्र किंचित वाढू शकते. अनेकांनी कांदा व मका लागवड कमी केली आहे. यामुळे बाजरीची पेरणी काहीशी वाढून सुमारे सात हजार हेक्टरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.

बाजरीची पेरणी खानदेशात साडेसहा हजार हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु अनेकांनी गहू पेरणी कमी केली आहे. चारा व धान्यासाठी बाजरीची पेरणी करण्यास शेतकरी पसंती देत आहेत. यामुळे बाजरीची पेरणी काहीशी वाढणार आहे. केळी पट्ट्यातही बेवडसाठी बाजरी पेरणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा भागात केळीची काढणी ९० ते ९५ टक्के पूर्ण झालेल्या बागांतही ठिबकवर बाजरीची पेरणी झाली आहे. तर रावेर, मुक्ताईनगर, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात केळी व इतर पिकांना बेवड, जमीन सुपीकता यासाठी बाजरीची पेरणी झाली आहे.

काळ्या कसदार जमिनीत फक्त चार वेळेस बाजरीचे सिंचन करावे लागते. ठिबक असल्यास अधिकचे पाणी लागत नाही. बाजरीचे दरही २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल, असे टिकून होते. चाऱ्यासही मागणी आहे. गहू, संकरित ज्वारी आदींची पेरणी कमी दिसत आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बाजरी पेरणीस वेग आला. पेरणी अद्यापही सुरू आहे.

पेरणी पुढे १५ ते २० दिवस सुरू राहील, असेही संकेत आहेत. अनेक शेतकरी थंड वातावरणात पेरणी टाळतात. कारण या काळात उगवणीवर परिणाम होतो, असे शेतकरी मानतात. यामुळे किमान तापमानात काहीशी वाढ झाल्यानंतर बाजरी पेरणीला आणखी काही दिवस वेग राहील, असेही सांगितले जात आहे.

जळगावात अधिकची पेरणी

बाजरीची सर्वाधिक सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पेरणी जळगाव जिल्ह्यात होईल, असा अंदाज आहे. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर बाजरी असणार आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे, नंदुरबारात शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार भागात बाजरीची पेरणी बऱ्यापैकी होईल. धुळ्यातील शिंदखेडा तालुका बाजरीत आघाडीवर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT