Farmer Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Award : कृषिदिनानिमित्त विद्यापीठात पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा गौरव

Agriculture Day : हरितक्रांतीचे प्रणेते (कै.) वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शासनाचे पुरस्कार प्राप्त असलेल्या विदर्भातील २१ शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

Team Agrowon

Akola News : हरितक्रांतीचे प्रणेते (कै.) वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शासनाचे पुरस्कार प्राप्त असलेल्या विदर्भातील २१ शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते.

विद्यापीठात सोमवारी (१ जुलै) झालेल्या या कार्यक्रमाला महाबीजचे मावळते व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, डॉ. सुरेंद्र काळबांडे, कुलसचिव श्री. राठोड, नियंत्रक प्रमोद पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्या हेमलता कृष्णा अंधारे, विठ्ठल सरप यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. उंदिरवाडे यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमात दिलीप फुके (चांभई, जि. वाशीम), श्रीमती ममता प्रमोद ठाकूर (कारला, जि. अमरावती), श्रीमती विमलादेवी गेडाम (राजुरा, जि. चंद्रपूर), भागवत श्रीराम ढोबळे (बाभूळगाव, जि. वाशीम), प्रवीणदास बेलखेडे (वाघोली, जि. अमरावती), सुनील चरपे (मेंढला, जि. नागपूर), ज्ञानेश्‍वर ढोरे (महागाव, जि. अकोला),

अभय भुते (जेवनाळा, जि. भंडारा), शशिभूषण उमेकर (टेंभूरखेडा, जि. अमरावती), रतनलाल बोरकर (सुलतानपूर, जि. वर्धा), युवराज आव्हाळे (जांब, जि. वाशीम), राजेश चोपडे (माटोडा, जि. अकोला), विठ्ठल मालेकर (दहेगाव, जि. यवतमाळ), आनंद बारबुद्धे (मोर्शी, जि. अमरावती), देविदास जाधव (घुसर, जि. बुलडाणा),

विठ्ठल पटले (सोनेगाव, जि. गोंदिया), चंद्रभान सावरकर (भुगाव, जि. नागपूर), रविंद्र वैद्य (नंदोरी जि. वर्धा), श्रीमती शांता गंगाराम धांडे (मडकी, जि. अमरावती), देवराव शेडमाके (डोंगरगाव, जि. चंद्रपूर) आदी शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सलामे यांनी, आभार प्रा. प्रकास घाटोळ यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT