Agriculture Recruitment Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Recruitment : कृषी उपसंचालक पदी नियुक्‍तीस टाळाटाळ

Agriculture Commissionerate : लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणे हे अनेकांचे स्वप्न असते. राज्यातील अनेक शेतकरी पुत्रांनी ही परीक्षा मोठ्या मेहनतीने पास केली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणे हे अनेकांचे स्वप्न असते. राज्यातील अनेक शेतकरी पुत्रांनी ही परीक्षा मोठ्या मेहनतीने पास केली. मात्र त्यानंतरही गेल्या पाच महिन्यांपासून त्यांना नियुक्‍तीच दिली जात नसल्याने त्रस्त उमेदवारांनी या विरोधात बुधवार (ता. १०) पासून पुणे येथील कृषी आयुक्‍तालयासमोर धरणे आणि साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

देशासह राज्यात बेरोजगारांची संख्या वाढती असताना तब्बल चार वर्षांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली. २०३ पदांसाठीची ही प्रक्रिया अत्यंत संथगतीने राबविण्यात आली. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये या २०३ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली. त्या पुढच्या टप्प्यात उमेदवारांकडून विभाग पसंतीक्रम मागविण्यात आला.

वर्ग-१ कृषी उपसंचालक पदाचे तर महसूल विभागातील पदांचे वाटप झाले असून आता फक्‍त पदस्थापना देणे बाकी आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर कृषिमंत्र्यांनी या संबंधीची कार्यवाही तत्काळ पूर्ण करणार असल्याचे निवेदनात सांगितले होते. मात्र कृषी खात्यात सध्या पदोन्नतीचा हंगाम असल्याने नियुक्‍तीची प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना ताटकळ ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

शासन निर्णयाप्रमाणे शिफारस झाल्यानंतर तीन महिन्यांत नियुक्‍ती देणे बंधनकारक आहे. परंतु हा नियम बासनात गुंडाळत कृषी विभागाकडून नियुक्‍ती टाळाटाळ केली जात आहे. त्याकरिता संबंधित विभागाकडून वेगवेगळी कारणे दिली जात असल्याचाही आरोप या उमेदवारांनी केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक, वनसेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या खात्याची परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्‍ती देण्यात आली. परंतु कृषी विभाग मात्र अडेलतट्टू धोरण अवलंबित आहे. त्यामुळेच येत्या १० जानेवारीपर्यंत नियुक्‍तीची प्रक्रिया न राबविल्यास १० जानेवारी पासून कृषी आयुक्‍तालयासमोर बेमुदत धरणे आणि साखळी उपोषण करण्याचा इशारा या उमेदवारांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT