APMC Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Auctions Update : विदर्भात १०० बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प

APMC Update : बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित करणाऱ्या प्रस्तावीत कायद्याला विरोध म्हणून सोमवारी (ता.२६) महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघांकडून लिलाव बंदचे आवाहन करण्यात आले होते.

Team Agrowon

Nagpur News : बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित करणाऱ्या प्रस्तावीत कायद्याला विरोध म्हणून सोमवारी (ता.२६) महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघांकडून लिलाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला विदर्भातही प्रतिसाद मिळत अमरावती व नागपूर विभागातील १०० बाजार समित्यांतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते.

बाजार समित्यांचे सध्याचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण तालुका आहे. मात्र प्रस्तावित कायद्यात हे कार्यक्षेत्र बाजार समिती आवारापुरतेच मर्यादित राहणार आहे. बाजार समित्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील खेडा खरेदी किंवा अन्य अवैध खरेदीवरही कारवाई करता येणार नाही.

त्याकरिता राज्य शासनाने पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीची स्थापना करून सूचना प्रसिद्ध करीत हरकती मागविल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता ज्या बाजार समित्यांमध्ये इतर राज्यातील शेतीमालाची आवक होत असेल अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्याचे प्रस्तावीत असून त्यामध्ये संचालक मंडळाचे अस्त्वि संपुष्टात येणार आहे.

या प्रस्तावीत कायद्यांना बाजार समिती संघाचा विरोध आहे. त्याच कारणामुळे सोमवारी (ता.२६) बंदची हाक देण्यात आली होती. राज्यभरातील ३०६ बाजार समित्या या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया ठप्प झाली.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ४५ तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ५५ बाजार समित्या आहेत. या १०० बाजार समित्यांमधील संपूर्ण कामकाज बंद असल्याने सोमवारी लिलाव झाले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT