Lasalgaon Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Ban On Onion Market : कांद्याची घसरण सुरूच! शेतकऱ्यांचा संताप, लिलाव पाडला बंद

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे सगळ्यात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. कांदा उत्पादन शेतकरी तर पुर्ण हतबल झाला असून कांदा आता थेट ५०० ते ८०० रुपयांवर आला आहे. यामुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा सगळ्यात मोठा फटका हा कांदा उत्पादन शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. यामुळे शेतकरी संतापला असून याचा भडका आज सोमवारी (२९ रोजी) लासलगाव बाजार समितीत (lasalgaon bazar samiti) पाहायला मिळाला. येथे कांद्याला भाव मिळत नसल्याने संपालेल्या शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलावच बंद पाडला आहे.

देशांतर्गत कांद्याचा पुरवठा आणि कांद्याचे दर नियंत्रितीत ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली गेली. यातंर्गत केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ७ डिसेंबरला निर्यातबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय आज कांदा कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी नुकसान दायक ठरत आहे.

कांद्याची पंढरी

नाशिकच्या लासलगाव बाजार समितीची ओळख ही कांद्याची पंढरी म्हणून आहे. येथे मोठ्या प्रमाणात कांदा लिलाव होतो. मात्र गेल्या काही दिवसापासून येथे कांद्याच्या दरात घसरण समोर येत आहे. यामुळे आज शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध येथे फुटला.

कांदा निर्यातबंदी उठवावी

तसेच त्यांनी सरकराकडे कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी करत कांदा लिलाव बंद पाडला. तसेच केंद्र सरकारच्या निर्यातबंदी निर्णयाविरोधात निषेध व्यक्त केला. तसेच निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कांद्याला फक्त १००० रुपये दर

केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणामुळे १६०० ते १८०० रूपये प्रति क्विंटल जाणारा कांदा आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. आता याच कांद्याला फक्त ५०० ते ८०० रुपयांत जात आहे. आजच्या लिलावातही कांद्याला फक्त १००० रुपये दर मिळाला. यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT