Solapur ZP  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur ZP : जि. प.च्या प्रशिक्षणार्थ्यांची ‘सीईओं’कडून हजेरी

ZP Trainee : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या स्तरावर एकूण ६९९ विद्यार्थ्यांना (इयत्ता बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण) सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Team Agrowon

Solapur News : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या स्तरावर एकूण ६९९ विद्यार्थ्यांना (इयत्ता बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण) सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

त्यासाठी शासनाकडून दरमहा विद्यावेतन देखील दिले जाणार आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधील कार्यरत प्रशिक्षणार्थींची मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी भेट घेऊन त्यांच्या कामाची माहिती घेतली. याशिवाय गैरहजर राहिलेल्यांचाही आढावा घेतला.

सोलापूर जिल्हा परिषदेत डिप्लोमा ॲण्ड सिव्हिल इजिनिअरिंग असिस्टंटचे शिक्षण पूर्ण असलेल्यांना साईट सुपरवायझर प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत १३ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्यात आले आहे. तसेच इलेक्ट्रीकल इंजिनिअर जनरल या विद्यार्थ्यांनाही त्याच पदासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून घेतले आहे.

याशिवाय पदवी, एमएससीआयटी, टायपिंग झालेल्या पदवीधर व अन्य शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेल्या ६०० विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये सहा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून अनुभव घेता येणार आहे. त्याअंतर्गत अनेकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

इयत्ता बारावी (विज्ञान) झालेल्या ७२ जणांना आरोग्य विभागाअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणुका दिल्या आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार सर्वांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्तीपत्रे मिळाली आहेत का, प्रशिक्षणार्थी नियमित येतात का, कोणी गैरहजर राहतात का, याची माहिती मंगळवारी श्री. जंगम यांनी घेतली. त्याचवेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींच्या अडचणीही जाणून घेतल्या. प्रशिक्षणार्थी काळात परस्पर गैरहजर राहणाऱ्यांना नोटिसा बजावण्याचेही आदेश त्यांनी यावेळी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT