Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : बनावट पावती पुस्तक प्रकरण दाबण्याचे प्रयत्न

APMC Fake Receipt : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बनावट पावती पुस्तकाद्वारे होणारा लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार दडपण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बनावट पावती पुस्तकाद्वारे होणारा लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार दडपण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. या प्रकरणी फौजदारी तक्रार आणि कारवाई करण्याच्या प्रशासनाच्या टिपणीवर सभापतींनी अद्याप स्वाक्षरी केली नसल्याचे समोर येत आहे.

याप्रकरणी एका संचालकांच्या समर्थकांच्या समावेशाची चर्चा बाजार आवारात असून, संचालकासह त्यांच्या समर्थकांना वाचविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. याप्रकरणी अतिक्रमण कारवाई आणि पार्किंग शुल्क वसुली करणाऱ्या विविध ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे बाजार समितीमध्ये बनावट पावती पुस्तकाद्वारे ‘नो पार्किंग’चा दंड आकारण्यात आल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. हुबेहूब आणि एकच क्रमांक असलेल्या दोन पावत्यांद्वारे बाजारशुल्क आणि पार्किंग शुल्क वसुलीचे प्रकरण उघड झाले.

यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू केली. मात्र ही प्रक्रिया संथ गतीने करून, केवळ नोटीस पाठविण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणात एका संचालकांच्‍या काही जणांचा त्यात सहभाग असल्याने त्याला वाचविण्यासाठीचा खटाटोप सुरू असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, बाजार समितीमध्ये संचालक नियुक्ती झाल्यापासून विविध गैर कामकाजाचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये अतिक्रमणे, अनिधिकृत टपऱ्या, पार्किंग शुल्क वसुली, ठेकेदारी, अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत लिबांचा व्यापार, आदी अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. हे प्रकार उघडकीस आल्यानंतर आता बनावट पावती पुस्तक तयार करून पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

असा आहे गैरप्रकार

बनावट पावती क्रमांक-४८३९ या पावतीवर २८ मे रोजी संतोष रेणुसे यांच्या (एमएच-१२ क्यूआर ९३१६) या वाहनाला ‘नो पार्किंग’च्या नावाखाली ३२० रुपये दंड लावला, तसेच ते दंड शुल्क वसूल केल्याचे समोर आले. तर १० सप्टेंबर २०२३ रोजी ४८३९ या मूळ पावती क्रमांकाद्वारे मे. सेजल ट्रेडिंग कंपनीने ४४ हजार १९ रुपयांचा सेस बाजार समितीकडे भरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT