Washim News : सध्या शेतशिवारांमध्ये उभे असलेले तुरीचे पीक अळ्यांच्या आक्रमणाने वेढले आहे. वातावरण बदलामुळे तुरीवर अळी आलेली असून फूल, शेंगा पोखरत आहे. यंदाच्या पावसाळ्यात सततचा पाऊस, अतिवृष्टीने नुकसान केले.
सोयाबीनवर येलो मोझॅक आणि कपाशी पिकावर लाल्या रोगामुळे संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे आता शेतकऱ्यांची भिस्त तुरीवर आहे.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तसेच दिवसा कडक ऊन, रात्री गारवा आणि सकाळी थंडी पडत असल्याने तूर पिकावर विपरित परिणाम झाला आहे.
वातावरणातील या बदलामुळे तुरीवर विविध प्रकारच्या अळ्या दिसून येत आहेत. शेतकऱ्यांना फवारणीसाठी अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तूर हे आंतरपीक म्हणून घेतले जाणारे एक प्रमुख पीक असून यंदाच्या खरीप हंगामात कारंजा तालुक्यात जवळपास ७ हजार हेक्टरपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर तुरीची पेरणी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्याने पावसातही तुरीचे पीक वाचले. पिकाची परिस्थिती उत्तम असली तरी मात्र वातावरणातील बदलाने तुरीवर विविध प्रकारच्या अळ्यांचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांकडून महागड्या कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.