Palkhi Sohala Agrowon
ॲग्रो विशेष

Palkhi Sohala : उद्या पंढरीत जमणार वैष्णवांचा मेळा; भक्तिरसात न्हाली पंढरी

Wari Update 2023 : आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर दिशेनं निघालेल्या संतांच्या पालख्या बुधवारी (ता.२८) पंढरीत दाखल होतील.

Team Agrowon

Pandharpur News : आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर दिशेनं निघालेल्या संतांच्या पालख्या बुधवारी (ता.२८) पंढरीत दाखल होतील. उद्या पालखीचे गोल आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ संपन्न होणार आहेत.

मागील पंधरा दिवस लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी भक्तिरसात तल्लीन झाले आहेत. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन भक्तांचा मेळा पंढरीत दाखल होत आहे. संतांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराज आणि संत मुक्ताबाई स्वागतासाठी वाखरीला जात असतात.

बुधवारी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा अखेरच्या विसाव्यासाठी वाखरी पालखी तळावर येत आहे. त्यामुळे १४ ते १५ लाख वारकरी पंढरीत जमणार आहेत.

त्यामुळे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. पुढील दोन दिवस वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, पंढरपुर तालुक्यात पालख्यांनी प्रवेश करताना विठ्ठल नावाचा गजर आसमंतात दुमदुमला. काल दुपारी बंधुभेट सोहळा आणि वारी वारकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो.

सोमवारी सकाळी पंढरपुर तालुक्यात संत गुलाब बाबा, संत गोविंद महाराज उपळेकर, संत निळोबा, राम महाराज, चांगा वटेश्वर, संत गवारशेठ या पालख्यांनी प्रवेश केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT