Sugarcane Harvesting Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : गळीत हंगाम आटोपल्याने साखर कारखान्यांवर शुकशुकाट

Sugarcane Crushing : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू झालेला गळीत हंगाम जवळपास आटोपला आहे. त्यामुळे पुणे विभागातील केवळ दोन साखर कारखाने सुरू आहेत.

Team Agrowon

Pune News : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू झालेला गळीत हंगाम जवळपास आटोपला आहे. त्यामुळे पुणे विभागातील केवळ दोन साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांवर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. ऊसतोड मजूरही परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत.

चालू वर्षी उसाची उपलब्धता अधिक असल्याने शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, उशिराने झालेल्या पावसामुळे गळीत हंगाम सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी उशिराने साखर कारखाने सुरू केले होते.

विभागातील पुणे, सातारा जिल्ह्यांतील १० नोव्हेंबरनंतर साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला. पुणे विभागात हंगामात ३४ साखर कारखान्यांपैकी ३१ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला.

विभागात सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना १२ फेब्रुवारी, तर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखाना २८ फेब्रुवारी रोजी गळीत हंगाम बंद केला. २९ कारखाने बंद झाल्यामुळे कारखाना कार्यस्थळावरील हॉटेल, दुकानातील ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे.

आत्तापर्यंत पुणे विभागात झालेले उसाचे गाळप :

एकूण सुरू झालेले साखर कारखाने -- ३१

दैनंदिन गाळप क्षमता, (टनामध्ये) -- २,०४,९५०

एकूण ऊस गाळप, (टनामध्ये) -- २,३६,३२,८४८

साखर उत्पादन, (क्विटंलमध्ये) -- २,४८,३६,६७५

सरासरी साखर उतारा, (टक्क्यांमध्ये) -- १०.५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT