Child Marriage In Parbhani Agrowon
ॲग्रो विशेष

Child Marriage In Parbhani : परभणी जिल्ह्यात एकाच महिन्यात तब्बल ३५ बालविवाह रोखले

परभणी जिल्ह्यातील बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या पुढाकारातून ‘बालविवाहमुक्त परभणी’ या अभियानाची सुरवात जानेवारी २०२३ मध्ये करण्यात आली.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील बालविवाह (child marriage) थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल (Collector Anchal Goyal) यांच्या पुढाकारातून ‘बालविवाहमुक्त परभणी’ या अभियानाची सुरवात जानेवारी २०२३ मध्ये करण्यात आली.

जिल्हा यंत्रणेने यंदाच्या मार्च महिन्यात तब्बल ३५ बालविवाह रोखण्यात यश मिळविले आहे. चार प्रकरणांमध्ये ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालविवाहमुक्त परभणी या अभियानाअंतर्गत जिल्हा यंत्रणेने चांगली कामगिरी बजावली असून आता शहरी भागातही अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवारी (ता. ५) येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदिप घोन्सीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, बालविकास अधिकारी कैलास तिडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, प्रतिक्षा भुते, आशा गरुड उपस्थित होते.

मार्च महिन्यामध्ये बालविवाह निर्मूलन समितीला एकूण ४४ विवाहांची माहिती प्राप्त झाली. या माहितीनुसार समितीने विवाहांची खातरजमा केली. त्यापैकी पाच विवाहातील वधुचे वय हे १८ वर्षें पूर्ण असल्याचे समितीच्या निदर्शनास आले.

त्यापैकी उर्वरित ३५ बालविवाह थांबविण्यात बालविवाह निर्मूलन समितीला यश आले असून, त्यातील पालकांना बालकल्याण समितीसमोर हजर राहण्यासाठी पोलिस विभागाकडून नोटीस देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT