Arvind Kejriwal Agrowon
ॲग्रो विशेष

Arvind Kejriwal : दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून अरविंद केजरीवाल यांना अटक

CBI Arrested Arvind Kejriwal : कथित दारू घोटाळा प्रकरणी ‘सीबीआय’ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात सीबीआयने केजरीवाल यांच्या विरोधात अनेक गंभीर दावे केले आहेत. ‘

Team Agrowon

Delhi CBI News : कथित दारू घोटाळा प्रकरणी ‘सीबीआय’ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात सीबीआयने केजरीवाल यांच्या विरोधात अनेक गंभीर दावे केले आहेत. ‘सीबीआय’ने कोर्टात सांगितले, की १६ मार्च २०२१ मध्ये एका दारू उद्योजकाने मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेतली होती. ()

१६ मार्चला दिल्लीच्या सचिवलयात मगुंटा रेड्डी आणि केजरीवाल यांची पहिल्यांदा भेट झाली होती, रेड्डी दक्षिणेतील खासदार आहेत आणि त्यांनी दारूच्या अबकारी धोरणावर केजरीवाल यांची मदत मागितली होती. यावर केजरीवाल यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले पण त्याबदल्यात आम आदमी पक्षासाठी निधीची मागणी केली होती.

(ॲग्रो विशेष)

मगुंटा रेड्डी यांच्यासमवेत कविता रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते, असा दावा ‘सीबीआय’ने केला आहे. कविता रेड्डी यांनी मुंगटा यांची हैदराबाद येथे भेट घेतली आणि पन्नास कोटी रुपयांची मागणी केली तसेच हा सगळा प्रकार मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निर्देशानुसार होत होता, असा दावा ‘सीबीआय’ने केला आहे.

विशेष न्यायाधीश अमिताभ रावत यांनी राऊस अव्हेन्यू कोर्टाच्या परवानगीनंतर सीबीआयने केजरीवाल यांना अटक केली आहे. सीबीआयचे म्हणणे आहे, की केजरीवाल त्या कॅबिनटचे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी दारूच्या धोरणाला मंजुरी दिली.

अरविंद केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी यांनी सीबीआयच्या अटकेला विरोध दर्शवला आहे. विक्रम चौधरी म्हणाले, की केजरीवाल सध्या ‘ईडी’च्या न्यायालयीन कोठडीत असताना ‘सीबीआय’ने अटक केली आहे, कोणता असा आदेश जारी झाला असेल तर आम्हाला तशी कोणतीच माहिती दिली गेली नाही. यामध्ये संविधानाच्या अनुच्छेद २१ चे उल्लघंन करण्यात आले. ‘सीबीआय’कडे मागणी आहे की त्यांनी अटक वॉरंटची कॉपी आम्हाला द्यावी, असे चौधरी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा व कापूस दर दबावात; शेवग्याला चांगला उठाव, मक्याची आवक स्थिर, तर कारलीच्या दरात चढ–उतार कायम

Local Body Elections: नळदुर्गमध्ये वीस मतदान केंद्रे

Farm Labour Shortage: सुगी आली तोंडावर, मजूर मिळेनात बांधावर 

Sanjay Raut on Bihar Election results: 'त्यांना ५० च्या आत संपवले!' बिहार निकालावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया

Hawaman Andaj: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका; सकाळी थंडी वाढली तरी दुपारी उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT