Urea Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Shortage : बारामती तालुक्यात युरियाची कृत्रिम टंचाई

Fertilizer in Baramati : बारामतीसह सुपे व उंडवडी परिसरात आठ-दहा दिवसांपासून युरियाची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Baramati News : बारामतीसह सुपे व उंडवडी परिसरात आठ-दहा दिवसांपासून युरियाची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. मात्र ही टंचाई कृत्रिम असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बारामतीसह सुपे व उंडवडी परिसरात काही दुकानांची माहिती घेत होते, तेव्हा इतर दुय्यम खते घेतली, तरच युरिया मिळेल, अशा स्वरूपाचे लिंकिंगचे प्रकार सुरू आहेत. काही खत विक्री करणारे दुकानदार युरिया शिल्लक नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

याबाबत उंडवडी कडेपठारचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी विभागीय कृषी सहसंचालक विभाग पुणे यांच्याकडे बारामती येथील खत विक्रेत्याची लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर तालुका कृषी कार्यालय ॲक्शन मोडमध्ये आले आहे. यानंतर तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी संबंधित दुकानाची तपासणी करून संबंधित खत विक्रेत्याला नोटीस देऊन खुलासा मागितला आहे.

बाबुर्डी येथील शेतकरी राजकुमार लव्हे यांनी सुपे येथील काही कृषी सेवा केंद्रांत युरिया असून देखील मिळत नसल्याची तक्रार बांदल यांच्याकडे केली. त्यानंतर बांदल यांनी संबंधित दुकानाची तपासणी केली. यामध्ये २०० पेक्षा अधिक पिशव्या युरिया आढळून आला. दरम्यान, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी धाड टाकल्याचे समजताच काही दुकानदार दुकाने बंद करून निघून गेले.

दोनच दुकानात त्यांना तब्बल ४ टन युरिया शिल्लक आढळला. त्याच्या पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. दरम्यान दुपारी उशिरापर्यंत कृषी विभागाची कारवाई सुरूच होती. सुपे परिसरात सात ते आठ खत विक्रेते असल्याने कारवाईला वेळ लागेल, असे कृषी खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

तक्रारी येत असलेल्या खत दुकानांची तपासणी करून कारवाईला सुरवात केली आहे. पंचनामा करून याबाबतचा अहवाल जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडे पाठवू.
- सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी, बारामती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT