Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : नगरला बाजार समितीत सोयाबीन, बाजरीची आवक सुरू

Nagar APMC : खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद व बाजरी पिकांची मळणी सध्या तालुक्याच्या शिवारात सुरू आहे. नगरमधील दादा पाटील शेळके नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन, बाजरीची आवक सुरू झाली आहे.

Team Agrowon

Nagar News : खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद व बाजरी पिकांची मळणी सध्या तालुक्याच्या शिवारात सुरू आहे. नगरमधील दादा पाटील शेळके नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन, बाजरीची आवक सुरू झाली आहे.

यावर्षीच्या पावसाचे अत्यल्प प्रमाणामुळे दरवर्षीच्या तुलनेत सोयाबीन, बाजरीसह, मूग, उडदाचीही आवक कमी होत आहे. सर्वसाधारणपणे ४७५ ते ५०० क्विंटल सोयाबीन, २५५ ते २७७ क्विंटल उडीद व ५० ते १०० क्विंटल प्रतीदिन याप्रमाणे बाजरीची आवक होत आहे.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी या पिकांची आक्टोबर, नोव्हेंबरमध्ये मोठी आवक होत असते. यंदा मात्र पावसाचा खंड, पिकांचे झालेले नुकसान पाहता उत्पादन कमी निघाले आहे.

त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सध्या नगर बाजार समितीत सोयाबीनची ३५० क्विंटलपर्यंत, बाजरीची २० क्विंटलपर्यंत, मुगाची १०० क्विटंलपर्यंत, तर मुगाची ८० क्विटंलपर्यंत आवक होत आहे.

सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती पाहता शासनाकडून विविध अनुदानासारख्या योजना राबविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु शेतकरी वर्ग आपला शेतमाल बाजार समितीऐवजी बाहेर विक्री करत असल्याचे समितीचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे बाजार समितीच्या वतीने शेतकरी वर्गास आवाहन करण्यात येते, की, बाजार समितीमध्येच आपला शेतमाल विक्री करावा. जेणेकरून आपल्या शेतमालाचे अचूक वजन होऊन योग्य बाजारभाव मिळेल.

‘बाजार समितीत मालाची विक्री करावी’

शासनाचे अनुदानासारखी योजना राबविल्यास बाजार समिती आवारातील विक्री पट्टीच्या आधारे अनुदानासारख्या योजनेचा लाभ होणेही सुकर होईल. बाजार समितीच्या आवाराबाहेर विक्री केलेल्या शेतमालाचा विचार शासन योजनेत घेतला जात नाही.

पर्यायाने शेतकरी वर्गास अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येते. अशी वेळ येऊ नये म्हणून शेतकऱ्यांची आपल्या शेतमाल नगर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विक्री करावा, असे आवाहन करण्यात आले आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT