Sheep Agrowon
ॲग्रो विशेष

Sheep Rearing : माणगाव तालुक्यात मेंढपाळांचे आगमन

Animal Care : उदरनिर्वाहासाठी घाटमाथ्यावरून मेंढपाळ माणगाव तालुक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. कोकणात पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणावर चारा मिळतो.

Team Agrowon

Mangaon News : उदरनिर्वाहासाठी घाटमाथ्यावरून मेंढपाळ माणगाव तालुक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. कोकणात पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणावर चारा मिळतो. त्‍यामुळे सातारा, पुणे पट्ट्यातील मेंढपाळ आपला मुक्‍काम पुढील काही महिने कोकणात करतात.

कोकणातील पाऊस संपल्यानंतर काही दिवसांनी आपापल्या शेळ्या-मेंढ्या घेऊन घाटमाथ्यावरील मेंढपाळ आपला प्रवास सुरू करतात. प्रतिवर्षी दिवाळी झाल्यानंतर घाटमाथ्यावरून अनेक मेंढपाळ कोकणात येत असतात. पारंपरिक ठरलेल्या गावातून प्रवास करत हे मेंढपाळ ठरावीक गावात मुक्काम करतात.

गावाच्या शिवारातील जंगलात मेंढ्या चरतात. पुढील काही महिने ते कोकणातच वास्तव्य करतात. रात्री शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्या बसवून त्याबदल्यात भात किंवा पैसे रोखीने घेतात.

शिवाय जमीन सुपीक ठेवण्यासाठी शेतकरीवर्गाकडून या मेंढपाळांना मोठी मागणी असते. या दिवसात कोकणात सण-उत्सव मोठ्या प्रमाणात असतात. या उत्सवात लग्न समारंभात मटणासाठी शेळ्या- मेंढ्या पुरविण्याचे काम हे मेंढपाळ करतात. सहा महिने आपल्या बिऱ्हाडासह उघड्यावर संसार मांडतात.

 गावांबरोबर सलोख्याचे संबंध

२०० ते ३०० शेळ्या-मेंढ्या, कोंबडी, घोडे असे सगळे बिऱ्हाड सोबत असते. मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वी मेंढपाळ परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. पुन्हा आलेल्याच मार्गाने प्रवास करून घाटमाथ्यावर पाऊस सुरू होण्यापूर्वी आपापल्या गावी पोहोचतात. प्रतिवर्षी घाट ते कोकण असा प्रवास करणारे मेंढपाळ परंपरागत या व्यवसायात आहेत.

कोकणातील गावांशी सलोख्याचे संबंध ठेवून राहणारे हे मेंढपाळ सहा ते सात महिने भटके जीवन जगतात. पाऊस गेल्याने पुन्हा हे मेंढपाळ दहा ते पंधरा दिवस प्रवास करून तालुक्यात दाखल होत आहेत. कोरोना महामारी व लांबलेला पाऊस यामुळे यावर्षी थोडा उशीर झाला असला तरी परंपरेनुसार तालुक्यात दाखल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT