Fall Army Worm Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Army Worm : खानदेशात मका पिकात लष्करी अळीचा प्रकोप कायम

Maize Pest Management : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा वाढली आहे. पण पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोपही यंदा अधिक आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा वाढली आहे. पण पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोपही यंदा अधिक आहे. पिकात किडनाशकांच्या फवारण्या घ्याव्या लागत असून, त्यात उत्पादन खर्चही वाढला आहे. सध्या एक ते दोन महिने कालावधीच्या पिकात लष्करी अळी दिसत आहे.

यंदा हरभरा, ज्वारीपेक्षा अधिक मक्याची लागवड खानदेशात झाली आहे. ही लागवड जळगावात सुमारे एक लाख दोन हजार हेक्टरवर झाली आहे. तसेच धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, साक्री आणि नंदुरबारमधील नवापूर, तळोदा, शहादा भागातही बऱ्यापैकी लागवड झाली आहे.

मक्याला मागील दोन हंगाम बऱ्यापैकी दर मिळाले आहेत. मागील खरीप व रब्बी हंगामातही मका लागवड बऱ्यापैकी होती. कारण दर चांगले राहीले. या हंगामातही दर व विपणन व्यवस्था लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. परंतु पिकात लष्करी अळीचा प्रकोप वाढला आहे.

हा प्रकोप दोन फवारण्या घेऊनही काही भागात थांबलेला नाही. एका फवारणीसाठी एकरी किमान १२०० ते १३०० रुपये खर्च येत आहे. तसेच मजुरी खर्चही लागत आहे. लष्करी अळीमुळे पिकाची हानी झाली आहे.

त्यात सुरवातीलाच १५ ते २० टक्के नुकसान झाले आहे. फवारणी वेळेत न घेतल्यास नुकसानीची पातळीही वाढत आहे. तसेच फवारणीचा खर्च पुढे अधिक करावा लागतो. फवारणीत किडनाशके किंवा अळीनाशकांसह संप्रेरके, अन्नद्रव्येदेखील फवारावी लागत आहेत.

कारण अळीमुळे पिकाची वाढ कमी होते. त्याची पुढे वाढ होऊन वेळेस निसवणी व कापणीदेखील आवश्यक आहे. यामुळे शेतकरी त्यात संप्रेरके व अन्नद्रव्ये आदींची फवारणीदेखील घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT