Rajma Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Rajma Crop : राजमा पिकाखालील क्षेत्र, उत्पादन वाढीस वाव

Rabbi Season : विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी : खरपुडी कृषी विज्ञान मंडळाचे मासिक चर्चासत्र

Team Agrowon

Chana Crop : जालना : हरभरा पिकाला पर्याय म्हणून राजमा पिकाचेक्षेत्र आणि उत्पादन वाढीस मराठवाड्यात नक्कीच वाव आहे, असे मत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाई, जि. बीड येथील विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे कृषी विज्ञान मंडळाच्या ३२७ व्या मासिक चर्चासत्रात ‘राजमा उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्त कृषिभूषण भगवानराव काळे हे होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी डॉ. संदीप जगताप, बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन पुणे येथील मुख्य कार्यक्रम अधिकारी संजय पाटील आणि कृषी विज्ञान केंद्राचेवरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, की राजमा पिकास उत्तम निचऱ्याची, मध्यम ते भारी जमीन उपयुक्त असून हे पीक ७५ दिवसांत तयार होते. राजमा पिकाच्या वरुण, फुले राजमा, फुले विराज इत्यादी सुधारित जाती उपलब्ध असून, पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करता येईल. कार्यक्रमाची सुरुवात नुकतेच निधन झालेलेदिवंगत मृद्शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. वराडे यांना श्रद्धांजली वाहून झाली. कृषी विभागाचे तंत्र अधिकारी डॉ. जगताप म्हणाले, की शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन एकात्मिक शेती पद्धतीद्वारे उपन्नात वाढ करावी, तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.

कृषिभूषण श्री. काळे म्हणाले, की शेतकरी हाच खरा शास्त्रज्ञ असून, त्यांनी स्वत:च्या अनुभवातून निर्माण केलेलेबियाणे किंवा इतर तंत्रज्ञान जपण्याची आवश्यकता आहे. तसेच शेती करणारी पुढील पिढी निर्माण करणे व त्यांना सांभाळून ठेवणे आवश्यक असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचेवरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन मृद्‍शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी केले, तर आभार गृहविज्ञान तज्ज्ञ डॉ. संगीता कऱ्हाळे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yeramala Yatra: येडेश्वरी देवीच्या जयघोषाने दुमदुमली येरमाळानगरी

Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान

Hapus Mango Prices: आवक वाढताच हापूसचे दर गडगडले

Electoral Roll Revision: कळंब तालुक्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण वेगात

Pre Monsoon Rain: नेवासा, पाथर्डी तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT