Chana Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Sowing : रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार

Rabi Season 2024 : रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून यंदाही शेतकऱ्यांचा कल हरभरा पेरणीकडे अधिक असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

Team Agrowon

Parbhani News : रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून यंदाही शेतकऱ्यांचा कल हरभरा पेरणीकडे अधिक असल्याचे दिसून येऊ लागले आहे. जिल्ह्यातील काही भागांत हरभरा पेरणीस सुरुवातही झाली असून आतापर्यंत जवळपास २० टक्के क्षेत्र हरभरा पेरणीखाली आले आहे. गत वर्षी ७२ टक्के क्षेत्र हरभऱ्याखाली आले होते.

जिल्ह्यात रब्बी पिकाचे १ लाख ४७ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. सोयाबीन निघाल्यानंतर रब्बी हंगामास साधारणतः प्रारंभ होतो. सोयाबीन काढणीस सुरुवात झाली असून काही भागांत उत्पादनाची सरासरी मिळत नसल्याने येणारा खर्च बघता मोडून टाकले आहे. या भागात आता रब्बीच्या पेरणीने जोर धरला आहे.

रब्बी हंगामात गहू व हरभरा, ही दोन मुख्य पिके घेतली जातात. गव्हाचे पीक हाती येण्यास लागणारा कालावधी व सिंचनाची सोय यामुळे सरासरी क्षेत्र कमी राहत आले आहे. गत वर्षी २८ टक्के क्षेत्रात गव्हाची पेरणी होती.

कमी कालावधीत, कमी पाण्यात व खर्चात हरभरा येत असल्याने शेतकऱ्यांची पहिली पसंती हरभऱ्यास मिळू लागली आहे. बाजारात हरभऱ्यास दरही बऱ्यापैकी मिळत असल्याने पेरणीचा ट्रेंड बदलला आहे. दर वर्षी हरभऱ्याखालील पेरणीक्षेत्रात वाढ होत आहे.

आतापर्यंत २० टक्के क्षेत्र लागवडीखाली

यावर्षीही हरभऱ्याखालील पेरणीक्षेत्र वाढणार असल्याचे शेतकऱ्यांच्या पसंतीवरून दिसून येऊ लागले आहे. हरभऱ्यास बाजारात चांगला भाव मिळत असल्याने त्याकडे कल वाढला आहे.

गत हंगामात हरभऱ्यास सात हजारी दर मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात वीस टक्के क्षेत्र हरभऱ्याखाली आले असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. गत वर्षी १ लाख ९ हजार हेक्टरमध्ये पेरणी होती. त्यामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT