Electricity Bill Recovery Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Electricity : ट्रान्सफॅार्मर मंजूर होऊनही बसवला नाही, शेतकऱ्यांची पिके जळू लागली

Electricity Transformer : पेनूर (ता. मोहोळ) येथील महावितरणच्या विद्युत उपकेंद्रात पाचएमव्हीएचा ट्रान्सफॅार्मर गेल्या आठ ते नऊ महिन्यांपूर्वी मंजूर झाला आहे. मात्र तो अद्यापही सुरू न झाल्याने पापरी, कोन्हेरीसह अन्य गावातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृतसेवा

Solapur News : मोहोळ, जि. सोलापूर ः पेनूर (ता. मोहोळ) येथील महावितरणच्या विद्युत उपकेंद्रात पाचएमव्हीएचा ट्रान्सफॅार्मर गेल्या आठ ते नऊ महिन्यांपूर्वी मंजूर झाला आहे. मात्र तो अद्यापही सुरू न झाल्याने पापरी, कोन्हेरीसह अन्य गावातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. तो ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसविला तर शेतकऱ्यांची पिके जळण्यापासून वाचणार आहेत. कमी दाबाने व विद्युत पुरवठा खंडित होण्याने शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनूर हे विद्युत उपकेंद्र ‘हेवीवेट’ म्हणून ओळखले जाते. या पेनूर उपकेंद्राच्या अधिपत्या खाली नऊ गावे येतात. आष्टी तलाव, उजनी डावा कालवा व आष्टी उपसा सिंचन योजना या पाणी स्त्रोतामुळे बागायती क्षेत्र विस्तारले आहे. परिणामी या भागात शेतकऱ्याकडून विजेची वाढती मागणी होत आहे. चालू वर्षी पेनूर उपकेंद्राने वसुली जिल्ह्यात वरचा क्रमांकही पटकावला आहे. सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. पारा जवळपास ४० ते ४२ अंशावर असतो.

सध्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस, मका, भुईमूग या पिकासो द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ या फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या साधारण दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना रात्री बारा ते सकाळी आठ पर्यंत विद्युत पुरवठा केला जातो.

मंजूर असलेला ट्रान्सफॉर्मर लवकर बसवला, तर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळणार आहे व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यापूर्वी मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर अद्यापही का बसवला नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच अडचणीत असलेला शेतकरी जादा अडचणीत आला आहे.

पेनूर चा ट्रान्सफॉर्मर गेल्या आठ ते नऊ महिन्यापूर्वीच मंजूर झाला आहे. आतापर्यंत तो बसवून, चालू व्हायला पाहिजे होता. पण झाला नाही, मी अधिकाऱ्यांना विचारणा करून तो प्रश्न मार्गी लावतो.

- यशवंत माने, माजी आमदार, मोहोळ

या ट्रान्सफॉर्मर संदर्भात तातडीने चौकशी करून तो लवकरात लवकर कसा बसवता येईल व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- राजू खरे, आमदार, मोहोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT