DPDC Meeting  Agrowon
ॲग्रो विशेष

DPDC Meeting : एक हजार कोटींच्या आराखड्यास मान्यता

District Planning Fund : जिल्ह्यात २०२४-२५ साठी १००० कोटी रुपयांच्या प्रस्तावित नियतव्ययाचा आराखडा राज्यस्तरीय बैठकीत मान्यतेस्तव ठेवण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्यात २०२४-२५ साठी १००० कोटी रुपयांच्या प्रस्तावित नियतव्ययाचा आराखडा राज्यस्तरीय बैठकीत मान्यतेस्तव ठेवण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. ही वाढ २०२३-२४ च्या मंजूर नियतव्ययाच्या तुलनेत ७८.५७ टक्के इतकी आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक रोहयो, फलोत्पादनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 8) जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली.

बैठकीस अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, विधान परिषद सदस्य आ. सतीष चव्हाण, आ. उदयसिंग राजपूत, विधानसभा सदस्य आ. हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाट, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभिजित देशमुख, स्वाती कोल्हे, ज्ञानेश्‍वर दुधारे, पंकज ठोमरे, समीर सत्तार तसेच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना उपस्थित होते.

बैठकीत प्रारंभी २०२३-२४ च्या नियतव्ययातून डिसेंबर २०२३ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा सादर करण्यात आला. त्यानुसार, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ५६० कोटी रुपयांच्या मंजूर नियतव्ययापैकी ३९२ कोटी ४ लक्ष रुपये उपलब्ध निधी असून, त्यापैकी ११६ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

१४० कोटी १९ लक्ष निधी वितरित करण्यात आला असून, डिसेंबर २०२३ अखेर ६५ कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये निधी खर्च झाला अशी माहिती देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेचा मंजूर नियतव्यय १०३ कोटी रुपये असून, ५१ कोटी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

त्यापैकी १४ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, सर्व निधी वितरित होऊन खर्चही झाला, अशी माहिती देण्यात आली. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी ९ कोटी ११ लाख रुपयांचा मंजूर नियतव्यय असून, ४ कोटी ८४ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध आहे. ५ कोटी ३७ लक्ष रुपयांचा कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, २ कोटी रुपये निधी वितरित झाला आहे. १ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला, अशी माहिती देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT