Drinking Water  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scheme : किकवी पेयजल प्रकल्पाला मंजुरी

Team Agrowon

Nashik News : तब्बल १५ वर्षांनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी पेयजल प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी (ता. ४) मंजुरी दिली आहे. नाशिक शहराची तहान भागविणारा एक हजार ४०० कोटींचा किकवी पेयजल प्रकल्प हा आता सुरू होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झालेली आहे.

२००९ मध्ये नाशिक महापालिकेने हा प्रकल्प शहरासाठी प्रस्तावित केला होता.एकूण पाणीसाठा ७०.३६ त्यापैकी उपयुक्त ६० दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. २०२१ मध्ये एक टीएमसी पाणी या प्रकल्पाद्वारे शहराला मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. गंगापूर धरणावरील अवलंबित्व कमी व्हावे, त्यावर अधिक ताण पडू नये, तसेच मराठवाड्याला अधिक पाणी मिळावे, या हेतूने किकवी पेयजल प्रकल्पाची योजना आखली गेली होती.

नाशिक शहराची वाढ वेगाने होत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिकाधिक तीव्र होईल. यासाठीची पूर्वयोजना म्हणून हा प्रकल्प सुरू करण्याचे ठरविले होते. मात्र, यासाठीची भूसंपादन,वन विभागाची परवानगी या अशा अनेक शासकीय बाबींमुळे हा प्रकल्प बारगळला होता.

दोन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिंडोरी येथील दौऱ्यात किकवी पेयजल प्रकल्पाला गती दिली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार ४ ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. आता अधिक गतीने प्रकल्प उभारणीसाठीच्या कामांना सुरवात होईल.

प्रकल्पाचे फायदे

-नाशिक शहरातील पाणीटंचाई प्रश्न मिटेल

-शहराच्या मध्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदीचे पूर नियंत्रण

-या प्रकल्पामुळे १.५० मेगावॉट वीजनिर्मिती शक्य

८८० हेक्टरचे भूसंपादन

किकवी प्रकल्पासाठी एकूण ८८० हेक्टर भूसंपादन होणे आवश्यक आहे. त्यापैकी ७०७ हेक्टर सर्व दहा गावांचे सरळ खरेदी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. मे-२०२४ मध्ये त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. सुधारित मान्यता प्रस्तावानुसार भूसंपादनासाठी ६६२ कोटी रुपये आवश्यक आहे. प्रकल्पासाठी १७२ हेक्टर वनजमीन आवश्यक आहे. वन विभागाची वन जमीन वळतीकरण क्षेत्र प्रस्तावास नव्याने तत्त्वतः मान्यता मिळण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT