Irrigation well scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Well Scheme : जळकोट तालुक्यात १४५ सिंचन विहिरींना मंजुरी

मनरेगा अंतर्गत २०२२-२३ मध्ये अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत आतापर्यंत १४५ विहिरी मंजूर असून, जवळपास ४० विहिरींची कामे पूर्ण आहेत.

Team Agrowon

Latur News : मनरेगा अंतर्गत २०२२-२३ मध्ये अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत (Irrigation well scheme) आतापर्यंत १४५ विहिरी मंजूर असून, जवळपास ४० विहिरींची कामे पूर्ण आहेत.

शासनाच्या नव्या निर्देशानुसार लाभार्थ्यास चार लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये तालुक्यातील २५ विहिरींचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी दिली.

शासनाच्या नव्या निर्देशानुसार आता विहिरीसाठी चार लाखांची तरतूद केली असून, जगळपूर (ता. जळकोट) येथील शेतकरी अशोक विश्‍वनाथ दुरनाळे यांच्या घरी स्वतः जाऊन गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी विहिरीची वर्क ऑर्डर देऊन विहीर खोदकामाचा बुधवारी (ता. ५) प्रारंभ केला.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून या विहिरीस मंजुरी देण्यात आली आहे. जगळपूर येथे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्या हस्ते खोदकामाचा प्रारंभ करण्यात आला.

या वेळी अभियंता एस. एस. स्वामी, सुनील लोहकरे, ग्रामसेवक सुशांत राजगीरवाड, रोजगार सेवक दिलीप पांचाळ, माजी सरपंच मन्मथ बुके, ग्रामपंचायत सदस्य ईश्‍वर बेंबरे, अशोक दुरनाळे, संभाजी दुरनाळे, ज्ञानेश्‍वर परांडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

या वर्षातल्या शासनाच्या नवीन जीआर प्रमाणे चार लाख रुपयांच्या विहिरीची वर्क ऑर्डर गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी स्वतः लाभार्थी अशोक दुरनाळे यांच्या घरी जाऊन दिली. विहिरीचे लाभार्थी दुरनाळे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व मनरेगा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

वर्क ऑर्डर मिळताच लवकरात लवकर काम शेतकऱ्यांनी पूर्ण करावे व सिंचनाखाली जमीन आणून लाभ घ्यावा व शासनाचा उद्देश पूर्ण करावा.
नरेंद्र मेडेवार, गटविकास अधिकारी, जळकोट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT