Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : बीज गुणन केंद्रातील २४८ अस्थायी पदांच्या भरतीला मंजूरी

Seed Multiplication Centre Recruitment : राज्य शासनाने कृषी आयुक्तालयांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात २४८ अस्थायी पदांना मंजूरी दिली आहे.

Roshan Talape

Pune News : राज्य शासनाने कृषी आयुक्तालयांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात २४८ अस्थायी पदांना मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे. यासंबंधित शासन निर्णय बुधवारी (ता. २५) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कृषी क्षेत्रातील सध्याच्या वाढत्या गरजांनुसार कृषी विभागातील अस्थायी पदांची नियुक्ती कायम ठेवण्याची मान्यता राज्य सरकारने दिली आहे. या शासन निर्णयानुसार ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ रिक्त असलेली पदे भरण्यात येणार नाही. परंतू या निर्णयाद्वारे विभागात सध्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या अस्थायी पदांनाच याचा लाभ मिळणार आहे.

कृषी आयुक्तालयांतर्गत असलेल्या तालुका बीज गुणन केंद्रामार्फत शेतकऱ्यांना उच्च प्रतीची बियाणे आणि कृषी सेवा उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. या अनुषंगाने येथे कार्यरत असलेल्यांसाठी या शासन निर्णयाद्वारे या तालुका बीज गुणन केंद्रातील २४८ पदे १ सप्टेंबर २०२४ पासून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

या विभागातील कृषी अधिकारी वर्ग-२, कृषी पर्यवेक्षक वर्ग-३, कृषी सहाय्यक वर्ग-३, शिपाई, प्रशिक्षित मजूर वर्ग-४ आणि टिलर ऑपरेटर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कायम राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ अधिक वेगाने पोहोचवण्यास ही भरती मदत करेल. ही पदे तात्पुरती असली तरी त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT