Onion Market Onion Market
ॲग्रो विशेष

Onion Export To UAE : संयुक्त अरब अमिरातीला अतिरिक्त १० हजार टन कांद्याची निर्यात

Central Government On Onion Export : देशात कांदा निर्यात बंदी लागू असून ती आद्याप उठलेली नाही. यादरम्यान वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार संयुक्त अरब अमिरातीला अतिरिक्त कांदा निर्यात करण्यात येणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : कांदा निर्यात बंदी जैसेथे असतानाच केंद्र सरकारने संयुक्त अरब अमिरातीला (युएई) कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढली असून अतिरिक्त १० हजार टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. याआधी वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने ६४,४०० टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती. 

दरम्यान देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच ३१ मार्चपर्यंत कांद्याची निर्यात बंदी कायम राहील, असे स्पष्ट केले होते. पण लोकसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर वाणिज्य मंत्रालयाने २२ मार्चला अधिसूचना काढत कांद्यावरील निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत अशीच राहिल असे जाहीर केले. 

अतिरिक्त कांदा निर्यात

वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी (ता. ०३) कांदा निर्यातीबाबत अधिसूचना काढली. यात युएईला अतिरिक्त १० हजार टन कांदा निर्यात केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच ही निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत करण्यात येईल, असेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. 

३ लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात

तर याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने (१८ फेब्रुवारी २०२३) कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली होती. याप्रमाणे केंद्र सरकारने ३ लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली.

कांदा निर्यात करण्यास परवानगी

वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, भारत सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेशला ६४,४०० टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती. यात भूतानला ५५० टन, बहरीनला तीन हजार टन, मॉरिशसला १२०० टन, बांगलादेशसाठी ५०,००० टन, संयुक्त अरब अमिरातीला १४,४०० टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली होती. यात आता अतिरिक्त १० हजार टन कांदा निर्यात होणार आहे. 

५ लाख टन कांदा खरेदीचे निर्देश

तसेच रब्बी हंगामातील कांद्याच्या होणारी अवक लक्षात घेऊन सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड या सरकारी एजन्सीजला शेतकऱ्यांकडून ५ लाख टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कांदा खरेदी करण्यासाठी दोन्ही एजन्सीजना प्रथम कांदा उत्पादत शेतकऱ्यांची नोंदणी करावी लागणार आहे. तर कांदा खरेदीपोटीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT