Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : भात खरेदीसाठी २८ केंद्रांना मंजुरी

Paddy Market : किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत २८ खरेदी केंद्रांवर खरीप व रब्बी पणन हंगामात शेतकऱ्यांना भाताची विक्री करता येणार आहे.

Team Agrowon

Alibaug News : किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत २८ खरेदी केंद्रांवर खरीप व रब्बी पणन हंगामात शेतकऱ्यांना भाताची विक्री करता येणार आहे. महिनाभरापासून जिल्ह्यातील शेतकरी भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत होते. अखेर ५ डिसेंबरपासून जिल्ह्यात भात खरेदी सुरू होणार आहे.

भाताची खरेदी ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली असून त्‍यानुसार शेतकऱ्यांना नियोजन करावे लागत आहे.

खरेदी केंद्रावर भातविक्रीसाठी आणताना प्रत्येक शेतकऱ्यांनी सोबत आधार कार्डची प्रत तसेच बँकेचे पासबुक आणणे आवश्यक आहे. तसेच, रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर केंद्रांवर आणलेले; परंतु खरेदी न झालेले धान सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांची असेल.

भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबत सात-बारा उताऱ्याची व गाव नमुना ८(अ)ची छायांकित प्रत केंद्रावर आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून खरेदी व्यवहार पूर्ण होईल. धान खरेदी करताना ते स्वच्छ कोरडे असावे. शेतकऱ्यांकडून उत्पादित करण्यात आलेले केवळ नवे धानच खरेदी करण्यात येणार आहे.

प्रति क्‍विंटल २,३०० रुपयांचा भाव

सर्वसाधारण भाताला दोन हजार ३०० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला आहे. तर अ दर्जाच्या भाताला दोन हजार ३२० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यात भाताची विक्री होते, त्यामुळे २८ केंद्रांवर भात खरेदीची व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने विहित केलेल्या प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त आढळल्यास, धान खरेदी करण्यात येणार नाही. जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त धान विक्रीसाठी आणू नये. केवळ नवे धान खरेदी केले जाईल. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे भरडधान्य असेल ते स्वच्छ व कोरडे असून विक्रीयोग्य असल्याची खातरजमा करूनच खरेदी करणार.
- के. टी. ताटे, जिल्हा पणन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT