Water  Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Department : शेतकरी, पाणीवापर संस्थांना पाण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

धरणांतील पाणी हे लाभक्षेत्रातील बारामाही उभ्या पिकांना रब्बी हंगामाअखेर पाणीपुरवठ्यासाठी असून क्षेत्रातील पिकांना पाणी घेताना शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी घ्यावे तथा सूक्ष्म सिंचनावर भर द्यावा.

Team Agrowon

Nashik Water News : नाशिक पाटबंधारे विभागाच्या (Nashik Irrigation Department) कार्यक्षेत्रातील नाशिक डावा तट कालवा, गोदावरी उजवा व डावा तट कालवा (Canal), आळंदी डावा व उजवा तट कालवा, पालखेड उजवा तट कालवा आदी लाभक्षेत्र तसेच वालदेवी, मुकणे, भावली, दारणा, वाकी, भाम, गंगापूर, कडवा, गौतमी-गोदावरी, काश्यपी व आळंदी ही धरणे तसेच कडवा, दारणा, गोदावरी नदीचा (Godavari River) भाग आणि गोदावरीवरील एकूण ९ कोल्हापूर बंधारे यांचा समावेश आहे.

या ठिकाणाहून प्रवाही व उपसा सिंचनाने पाणी घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी व पाणी वापर संस्थांनी पाण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी केले आहे.

शासनाच्या धोरणानुसार धरणातील उपलब्ध पाणी हे उन्हाळ हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात शेतीच्या पिकासाठी व औद्योगिक कारखान्यांना पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

धरणांतील पाणी हे लाभक्षेत्रातील बारामाही उभ्या पिकांना रब्बी हंगामाअखेर पाणीपुरवठ्यासाठी असून क्षेत्रातील पिकांना पाणी घेताना शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी घ्यावे तथा सूक्ष्म सिंचनावर भर द्यावा.

पाणी पुरवठ्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची जबाबदारी व्यक्तीश: शेतकऱ्याची असून त्याबाबत शासनाकडून कोणतीही भरपाई मिळणार नाही, असे कळविण्यात आले आहे.

ज्या कालव्यांवर अथवा चारीवर नमूना नंबर ७च्या प्रवर्गातील मागणी उपलब्धतेपेक्षा जास्त असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात शाखा, उपविभाग स्तरावर सम प्रमाणात कपात करून विहित अटी व शर्तीनुसार मंजुरी देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT