Rabi Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Irrigation : पाटबंधारेच्या कार्यक्षेत्रात रब्बी सिंचनासाठी अर्जप्रक्रिया सुरू

Rabi Season : रब्बी हंगाम २०२३-२४ संरक्षित सिंचनाकरिता विहिरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या सर्व प्रकारच्या उभ्या पिकांसाठी हंगामी भुसार, फळबाग, बारमाही पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकक्षेतील गंगापूर डावा तट कालवा, गोदावरी उजवा व डावा तट कालवा, आळंदी डावा व उजवा तट कालवा, पालखेड व कडवा उजवा तट कालवा, भोजापूर डावा कालवा इत्यादी मोठ्या व मध्यम प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील तसेच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी व सिन्नर तालुक्यांतील लघु प्रकल्पांमधून प्रवाही व उपसा सिंचनाने पाणी घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी शेतकरी व पाणी वापर संस्थांनी २०२३-२४ रब्बी हंगामासाठी पाण्याचा लाभ घेण्याकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले.

मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांतून त्याचप्रमाणे वाकी, भाम, भावली, दारणा, मुकणे, वालदेवी, गंगापूर, कडवा, भोजापूर, गौतमी, गोदावरी, काश्यपी व आळंदी या धरणांचा जलाशय व नदी यावरून तसेच दारणा-गोदावरी नदीचा भाग आणि गोदावरी नदीवरील या विभागाच्या अधिपत्याखालील एकूण १० व कोल्हापूर बंधाऱ्यांचे पाणी प्रवाही उपसासिंचनाने पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या धरणक्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन ठराविक क्षेत्रापर्यंत नमूना नंबर ७ प्रवर्गात रब्बी हंगाम २०२३-२४ संरक्षित सिंचनाकरिता विहिरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या सर्व प्रकारच्या उभ्या पिकांसाठी हंगामी भुसार, फळबाग, बारमाही पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे.

धरणातील उपलब्ध असलेले पाणी उन्हाळा हंगाम अखेरपर्यंत पुरवावे लागणार असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन उर्वरित पाण्याचा शेतीच्या पिकांसाठी व औद्योगिक कारखन्यांना पुरवठा करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा सुलभ व्हावा यासाठी मंजूर क्षेत्रातील उभ्या पिकांना पाणी घेताना शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने घ्यावे. पाणीपुरवठ्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची जबाबदारी ही त्या शेतकऱ्याची व्यक्तीश: असणार आहे. यासाठी शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही.

ज्या कालव्यावर अथवा चारीवर नमूना ७ ची प्रवर्गात मागणी पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात शाखा किंवा उपविभाग स्तरावर सम प्रमाणात कपात करून मंजुरी देण्यात येणार आहे.

सहकारी पाणी वापर संस्थांचे लाभक्षेत्रातील कोणत्याही वैयक्तिक लाभ धारकाला नमुना नंबर ७ वर पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्याकरिता सहकारी पाणी वापर संस्थेतील लाभधारकांनी संस्थेकडेच पाणी मागणी नोंदविणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT