Women Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Woman Farmer Award : ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार’ देण्याची घोषणा

Team Agrowon

Amaravati News : श्री शिवाजी शिक्षण संस्थेने या वर्षीपासून विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महिलेसाठी शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांच्या प्रेरणेतून व त्यांनी दिलेल्या दाननिधीच्या व्याजातून हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार आहे.

विदर्भातील महिलांसाठीच हा पुरस्कार असून, प्रवेशिका ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने ११ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. १८) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

या वेळी कोशाध्यक्ष दिलीप इंगोले, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर उपस्थित होते. पुरस्कार विजेत्या शेतकरी महिलेस १ लाख ११ हजार १११ रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, केंद्र सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रसारित केलेले १२५ रुपयांचे नाणे, साडी, चोळी, शाल व श्रीफळ असा सन्मान बहाल करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांच्या अध्यक्षतेत निवड समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

प्रस्तावाचा विहित नमुन्यातील अर्ज कृषी महाविद्यालय मोर्शी रोड येथे व महाविद्यालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्पर्धकांना ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज सादर करता येणार आहे.

प्रस्ताव पाठविण्याची अखेरची मुदत ११ नोव्हेंबर असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. यामध्ये विदर्भातील शेतकरी महिलांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती महोत्सवात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

पात्रतेचे निकष

प्रत्यक्ष शेती करणारी महिला असणे आवश्यक असून, प्रस्ताव पाठविणाऱ्या महिलेच्या नावे शेती असावी किंवा पतीच्या नावे असलेल्या शेतीच्या सात-बारावर भोगवटादार म्हणून महिलेचे नाव असावे. यशस्वी उत्पादन, रोपवाटिका, बीजोत्पादन, सेंद्रीय निविष्ठा उत्पादन, वापर व व्यवस्थापन, साठवणूक, प्रतवारी, पॅक हाउस, मूल्यवर्धन, प्रक्रिया व विपणन, निर्यात इत्यादी कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन अधिकाधिक नफा कमावणारी महिला असावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement : शिराढोणला सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू होणार

Crop Damage : ‘ओझरखेड’च्या आवर्तनाने पिके पाण्याखाली

Crop Damage : पावसामुळे सोयाबीनसह तुरीचे पीक पाण्यात

Soil Erosion : जमिनीची धूप थांबविली तरच भविष्यात शाश्‍वत उत्पादन

Soybean Harvesting : सोयाबीन कापणीला एकरी सहा हजारांचा खर्च

SCROLL FOR NEXT