Milk Price Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Price : दूध दरासाठी मंत्री विखेंच्या 'अमूल'ला पायघड्या; दूध प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश?

Radhakrishna Vikhe Patil on milk price : राज्‍यातील प्रक्रिया केंद्राना दूध भुकटीला अनुदान दिले जाते, तसेच परराज्‍यातील प्रक्रिया केंद्रानाही मिळावे, अशी मागणी परराज्यातील दूध प्रक्रिया केंद्रांनी केली. यावर विखे यांनी, या मागणीबाबत सरकार सकारात्‍मकतेने विचार करेल, असे आश्वासन दिले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात दुधाला दरवाढ द्यावी, या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक आंदोलन करत आहेत. त्यात आता राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी परराज्यातील दूध संघांसाठी पायघड्या पसरल्या आहेत. मंत्री विखे यांनी दूध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 'अमूल'सह परराज्यातील दूध संघांनी महाराष्ट्रातील अतिरीक्त २० लाख लिटर दुधाचे संकलन करावं, असं आवाहन केलं आहे. तसेच दूध प्रक्रिया केंद्रांनी यासाठी सहकार्य केल्यास अतिरीक्त दुधाचा प्रश्नासह दूध उत्‍पादकांना ३५ रूपये भावही देता येईल,  असा दावा विखे यांनी केला आहे. मुंबईत मंगळवारी (ता.१६) दूध व्‍यवसायिक आणि दूध प्रक्रिया केंद्राच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीदरम्यान मंत्री विखे बोलत होते. 

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दुधाच्या पडणाऱ्या भावामुळे त्रस्त झाले आहेत. तर दुधाला अनुदान नको ४० रूपये दर द्या अशी मागणी करत आहेत. मात्र दूध प्रश्न सोडवण्यात मंत्री विखे यांना अपयश आलं आहे. राज्य सरकारने दूध संघांसाठी दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३५ रुपये दर निश्चित केला आहे. यामध्ये दूध संघांनी ३० रुपये दर दिल्यास राज्य सरकार ५ रुपये अनुदान देईल, अशी खुटी राज्य सरकारनं मारून ठेवली आहे.  निश्चित केलेल्या दराप्रमाणे राज्यातील दूध उत्पादकांना दर मिळावा, यासाठी मंत्री विखे यांनी मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीला अमूल, पंचमहाल, युनियन, कैरा युनियन, वलसाड, सुमूल आणि भरुज येथील युनियनचे प्रतिनिधी आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड उपस्थित होते. 

मंत्री विखे यांनी राज्य सरकारने निश्चित केलेल्या ३-५ आणि ८-५ फॅट गुणवत्तेसाठी ३५ रूपये दर देण्याचे आवाहन दूध प्रक्रिया केंद्रांना केले. तर केंद्राना दर लागू करताना काही अडचणी आल्यास विभागामार्फत सोडवू, असेही आश्वासन दिले. विखे म्हणाले, "राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न असून तो सोडवणे गरजेचे आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास अतिरिक्त २० लाख लिटर दुधाचे संकलन होण्यास मदत मिळेल. यासाठीच राज्यातील दूध प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य करायला हवे." असं विखे म्हणाले. 

तसेच दूध उत्पादकांच्या दुधाला हमीभाव मिळावा या मागणीची माहिती आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याची माहिती विखे यांनी यावेळी दिली. तर दुधाच्या हमीभावासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून यावर लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असा विश्वास विखे व्यक्त केला. यावेळी राज्‍यातील प्रक्रिया केंद्राना दूध भुकटीला अनुदान दिले जाते, तसेच परराज्‍यातील प्रक्रिया केंद्रानाही मिळावे, अशी मागणी उपस्थित परराज्यातील दूध प्रक्रिया केंद्रांनी केली. यावर विखे यांनी, या मागणीबाबत सरकार सकारात्‍मकतेने विचार करेल, असे आश्वासन दिले आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT