Unseasonal rain Agrowon
ॲग्रो विशेष

Anil Patil : मदत व पुनर्वसन मंत्री थेट बांधावर ; नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे आश्‍वासन

Unseasonal rain : अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त पिकांची मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली.

Swapnil Shinde

Nashik News : राज्यात रविवारी झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकासह कांदा, कापूस, तूर, पालेभाज्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असा दिलासा मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने (Unseasonal Rain) नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला कृषिमंत्री धनंजय मुंडे, अनिल पाटील व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत केंद्र सरकारकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुढील १० दिवसात राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर आज सकाळपासून नुकसानग्रस्त भागामध्ये कृषी विभागाच्यावतीने पंचनाम्यास सुरूवात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT