Orange Agrowon
ॲग्रो विशेष

संत्रा उत्पादकांना हेक्‍टरी लाखाची मदत करा ः अनिल बोंडे

यावर्षी तापमानातील वाढ आंबिया बहरातील फळांसाठी मारक ठरली आहे.

टीम ॲग्रोवन

अमरावती : यावर्षी तापमानातील वाढ (High Temperature) आंबिया बहरातील फळांसाठी मारक ठरली आहे. लहान आकाराच्या फळांची यामुळे गळ (Fruit Falling) झाल्याने जवळपास ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. त्याची दखल घेत संत्रा उत्पादक (Orange Growers) शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत (Financial Assistance) द्यावी, अशी मागणी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे.

बोंडे यांच्या माहितीनुसार, संत्रा लागवडीखालील राज्याच्या दीड लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी एक लाख हेक्‍टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. या क्षेत्रावर आंबिया व मृग बहार घेतला जातो. राज्याची एकूण उत्पादकता पाच लाख टन इतकी आहे. सरासरी वीस हजार रुपये टन असा दर अपेक्षित धरल्यास फळगळमुळे सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तापमानातील वाढ कायम असल्याने सध्या बागांचे अस्तित्व राखण्यासाठी बागांना पाणी देण्याची गरज आहे. परंतु काही शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे तर काही ठिकाणी पाणी असताना विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाट किंवा ठिबकने पाणी देण्यात भारनियमनाचा अडसर निर्माण झाला आहे. शासनाचे विमा भरपाईचे आणि शासन पातळीवरून मदतीचे निकष देखील संत्रा उत्पादकांच्या हिताचे नाहीत.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था देखील अशावेळी कुचकामी ठरल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. तर दुसरीकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सर्वच शेतकऱ्यांसाठी अस्तित्वहीन झाले आहे. या विद्यापीठाचा विदर्भातील शेतकऱ्यांना कोणता उपयोग होतो किंवा झाला आहे याबाबत एक स्वतंत्र अहवालच मांडण्याची गरज निर्माण झाली आहे. विदर्भातील शेतीला पूरक असे कोणतेच वाण, तंत्रज्ञान विद्यापीठाला देता आले नाही हे विद्यापीठाचे मोठे अपयश मानता येईल, असा आरोपही अनिल बोंडे यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT