Agriculture Minister Controversy  A
ॲग्रो विशेष

Agriculture Minister Controversy : कृषिमंत्र्यांचा विधानाचा विदर्भात निषेध

Manikrao Kokate : कर्जमाफीच्या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांद्वारे लग्न, साखरपुड्यावर केला जात असल्याचे कथित व्यक्‍तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते.

Team Agrowon

Yavatmal / Akola News : शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील व अपमानजनक वक्‍तव्य केल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वतीने आर्णी येथील शिवनेरी चौकात रविवारी (ता. ६) कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा प्रतिकात्मक पुतळा फासावर लटकवीत आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील बहिरखेड फाटा येथे शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांच्या फोटोला ‘चपला मारो’ आंदोलन केले.

कर्जमाफीच्या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांद्वारे लग्न, साखरपुड्यावर केला जात असल्याचे कथित व्यक्‍तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. कर्जमाफीच्या अपेक्षेने दहा-दहा वर्षे कर्जाची परतफेड केली जात नाही. मात्र कर्जमाफीनंतर ही अशा पैशाचा उपयोग शेतीकामी केला जात नाही, असेही श्री. कोकाटे म्हणाले होते.

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने त्यांच्या या वक्‍तव्याचा निषेध करण्यात आले. शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, आर्णी तालुका प्रमुख उज्ज्वल मोरे, पंकज शिवरामवार, रमेश ठाकरे, पवन वाघमारे, दिनेश पवार, आनंद शिंदे, गोकुठ शिंगघर, प्रमोद शिंदे, गोविंद बिस्मोरे या आंदोलनात सहभागी झाले होते.

बार्शीटाकळी तालुक्यातील बहिरखेड फाटा येथे आंदोलनात किरण ठाकरे, महादेव गावंडे, अविनाश ठाकरे, प्रल्हाद माळकर, गणेश ताठे, दिलीप घुमसे, मनोहर कमानदार, जनार्दन ठोकळ, सुरेश वानखडे, स्वप्निल ठाकरे, अनंता घुमसे, मंगेश सोनटक्के, देविदास ठाकरे आदी उपस्थित होते.

राजीनाम्याची मागणी

या वेळी शिवसैनिकांनी आक्रमक होत शेतकऱ्यांविरोधात वारंवार बेताल वक्‍तव्य करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीजरी नैतिकता असेल तर त्यांनी हे काम तत्काळ करावे, असेही शिवसैनिकांचे म्हणणे होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT