Amravati News : अमरावती ः राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पालकमंत्री निश्चित झालेले नसून पालकमंत्रिपदासाठी राजकीय मंडळींमध्ये स्पर्धा लागली आहे, तर दुसरीकडे अमरावती जिल्हापरिषदेकडून मात्र एक वेगळाच उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुकानिहाय एक पालक अधिकारी, अशी ही संकल्पना राबविली जाणार असून त्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या विकासावर व प्रशासनावर लक्ष ठेवणे सोयीचे होणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ नुसार विविध विकास योजना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येतात. केंद्र व राज्य सरकारकडून लोकोपयोगी व कल्याणकारी विविध योजना व अभियान राबविण्यात येत असून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी १४ तालुक्यांकरीता स्वत:सह जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांची प्रत्येक तालुक्यास ‘तालुका पालक अधिकारी’म्हणून नेमणुक केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकताच आदेश जारी केला आहे.
नेमलेल्या प्रत्येक पालक अधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यात केलेल्या दौरा, भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी आणि ओटी मध्ये रूग्णासाठी आवश्यक सोयीसुविधा आहेत का, मुदतबाह्य औषधी साठ्याचे निर्लेखन झाले आहे का0, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, परिसरात स्वच्छता होते का, इमारतीत पायाभूत सुविधा आहे काय,
आरोग्य कर्मचारी यांचे उपस्थितीत अभिप्राय व अन्य तसेच जिल्हा परिषद शाळांना भेटी देतेवेळी शाळेतील एकूण पटसंख्या, शाळा इमारत, पिण्याचे पाणी, मुला, मुलीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, परिसर स्वच्छता, आदर्श शाळा निकषानुसार शाळेत राबविण्यात येत असलेले उपक्रम आदी बाबतची माहिती जाणून घेण्याच्या सूचना सीईओंनी दिल्या आहेत. त्यानुषंगाने तालुका स्तरावर आढावा घेणे आवश्यक आहे.
पंचायत समिती स्तरावर मार्गदर्शन, सहकार्य, सहाय्य करणे व नियंत्रण ठेवणे यासाठी प्रत्येक पंचायत समितीसाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांनी तालुका पालक अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे, प्रत्येक महिन्याला या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.