Revenue Department Agrowon
ॲग्रो विशेष

Amravati Revenue Department : अमरावती महसूल विभागात रिक्त पदांचा अनुशेष ;उपजिल्हाधिकाऱ्यांची २१, तर नायब तहसीलदारांची ३६ पदे रिक्त

Amravati Revenue Department vacancies : महसूल विभागाचा डोलारा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत अक्षम्य विलंब होत आहे.

Team Agrowon

Amravati News : अमरावती ः महसूल विभागाचा डोलारा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत अक्षम्य विलंब होत आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण येऊ लागला आहे. अमरावती विभागात नायब तहसीलदारांची तब्बल ३६ पदे रिक्त असून उपजिल्हाधिकाऱ्यांची २१ व अपर जिल्हाधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त आहेत.

अमरावती विभागात पाच जिल्हे असून अमरावती विभागीय मुख्यालयाचे ठिकाण आहे. विभागीय आयुक्तालयातच अपर जिल्हाधिकाऱ्यांची सर्व तीनही पदे रिक्त आहेत, तर जिल्हापातळीवर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यास या दर्जाचा एकही अधिकारी नाही. या दोन्ही जिल्ह्यांसाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक पद आहे. विभागीय आयुक्तालयात उपजिल्हाधिकाऱ्यांची दोन पदे आहेत. विद्यमान स्थितीत तेथे केवल एकच अधिकारी कार्यरत आहे.

तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात चार, अकोला पाच, यवतमाळ सात, बुलडाणा एक व वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात तीन, असे एकूण २१ उपजिल्हाधिकारी पदे रिक्त आहेत.
सर्वाधिक पदे नायब तहसीलदारांची आहेत. विभागात एकूण आयुक्तालय व पाच जिल्हे मिळून नायब तहसीलदारांची २८७ पदे आहेत. त्यापैकी ३६ पदे रिक्त आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १६ नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत, तर अमरावती सात, अकोला दोन, यवतमाळ आठ व वाशीम जिल्ह्यातील तीन पदे रिक्त आहेत.
राज्य व केंद्रांच्या योजनांच्या अंमलबजावणीत नायब तहसीलदार यांची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. मात्र अमरावती आयुक्तालयांतर्गत याच पदांचा अनुशेष मोठा आहे. त्यामुळे लाभार्थींना योजनांचा लाभ मिळवताना मोठा त्रास सहन करावा लागतो. याशिवाय एकाच नायब तहसीलदारांकडे अनेक योजनांचा भार आल्याने कामाचा ताण वाढला आहे.

विभागातील रिक्त
पदांची स्थिती

अपर जिल्हाधिकारी ५
उपजिल्हाधिकारी २१
तहसीलदार ः ०१
नायब तहसीलदार ३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT