Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : मॉन्सूनची अमरावती, चंद्रपूरपर्यंत धाव

Monsoon News : पूर्व विदर्भात मात्र अद्यापही प्रतीक्षा

Team Agrowon

Weather Update : पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे. बुधवारी (ता. १२) अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतली आहे. अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करणाऱ्या मॉन्सूनचा बंगालच्या उपसागरावरील वेग मंदावलेला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात अद्यापही मॉन्सूनची प्रतीक्षा आहे.

अरबी समुद्रावरून मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत आहे. केरळमध्ये दोन दिवस आधीच मॉन्सून दाखल झाला होता. त्यानंतर मोसमी वारे चार दिवस अगोदर ६ जून रोजी महाराष्ट्रात डेरेदाखल झाले. ८ जून रोजी पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागात देखील मॉन्सून पोचला होता. ९ जून मॉन्सूनने मुंबईसह, ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्यांच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली.

सोमवारी (ता. १०) वाटचाल सुरूच ठेवत डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत मजल मारली. तर मंगळवारी (ता. १३) संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांशी भाग, विदर्भाच्या काही भागात मॉन्सून पोचला. तर सोमवारी (ता. १३) पश्चिम विदर्भाच्या आणखी काही भागात मॉन्सून पोचला आहे. संपूर्ण तेलंगणा व्यापणाऱ्या मॉन्सूनची उर्वरित देशातील वाटचाल मात्र कायम आहे. बंगालच्या उपसागरावरून मात्र मॉन्सूनचे प्रवाह अद्यापही क्षीण आहेत. पुढील तीन दिवसांत छत्तीसगड, आंध्र प्रदेशाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT