Ambadas Danve Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अंबादास दानवेंसमोर अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर

Ambadas Danve : सिंदखेडराजा, जि. बुलडाणा येथील नुकसानग्रस्त पिकांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Team Agrowon

Buldhana News : दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपीट, वादळामुळे या भागातील अनेक गावांत शेडनेटमध्ये बीजोत्पादन घेणारे शेतकरी उघड्यावर आले आहेत. या भागात बुधवारी (ता.२९) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

या वेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. ‘‘शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला जाब विचारणार,’’ असे आश्‍वासन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिले.

सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का गावात नुकसान झालेल्या शेडनेटची, पिकांची दानवे यांनी पाहणी केली. यानंतर शेतकऱ्यांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे.

परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गारा आणि पावसाने मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या शेडनेटला विम्याचे संरक्षण नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार आहे.’’

‘‘मागील दोन तीन दिवसांतील पावसामुळे हरभरा, कापूस, गहू व तूर यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेडराजा, देऊळगावराजा या भागात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे शेडनेटचे प्लॉट जमीनदोस्त झाले.

शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. बियाणे कंपन्यांनी हात वर केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांच्या भरोशावर बियाणे कंपन्या मोठ्या होतात. परंतु त्यांना नुकसानीच्या काळात मदत करीत नाहीत. यासंदर्भातही हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला प्रश्न विचारू,’’ असा विश्‍वास दानवे यांनी दिला.

शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते लक्ष्मण वडले, संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार सचिन जैस्वाल, प्रभारी कृषी तालुका अधिकारी भागवत किंगर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना अश्रू अनावर

अंबादास दानवे यांनी पळसखेड चक्का गावात भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या वेळी शेतकऱ्यांनी अनेक अडचणी सांगितल्या. व्यथा मांडत असताना शेतकरी बालाजी सोसे यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक महिला शेतकऱ्यांनी देखील अनेक समस्या दानवे यांच्यासमोर मांडल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT