Amba Mohar
Amba Mohar Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Production : आंब्याला मोहर उशिरा

Team Agrowon

Raigad Mango Crop News : निसर्गाचा लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी पाऊस त्यामुळे वातावणात होणारा बदल याचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

या वर्षी अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे यंदा आंब्यांच्या झाडांना उशिराना मोहर आला आहे. त्यातच मोहराबरोबरच नवीन पालवी फुटत असल्याने आंबा उत्पादन लांबवणीवर जाणार आहे; तर ५० टक्के आंबा झाडांना मोहर आला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

विक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवडीचे उत्पादन घेतले जाते. विक्रमगड तालुक्यातील माण, झडपोली, ओंदे, मलवाडा, कुरंझे, मुहू भागात शेतकरी दर वर्षी मोठ्या प्रमाणात आंब्यांचे उत्पादन घेत आहेत;

परंतु गेल्या पाच-सहा वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे; तर या वर्षी केवळ ६० टक्के उत्पादन हाती येणार असल्याचे शेतकऱ्यानी सांगितले.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, त्याचा सर्व्हे करून आर्थिक मदत करण्याची मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्यानी केली आहे.

सध्या आंब्यांच्या झाडांना उशिराने मोहर आला असला, तरी या झाडांना मोहराबरोबरच पालवीही फुटत आहे; तर ५० टक्के झाडांना मोहरच आला नाही. काही दिवसांपासून हवामानातील बदलांमुळे व काहीसे ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील आंबा बागायतदार बाळकृष्ण पाटील यांनी सांगितले. मात्र काही भागांत कमी प्रमाणात झाडांना मोहर आला असला तरीही वातावरणाच्या बदलांमुळे तो करपून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडत आहेत.

जून महिना उजाडणार

यंदा नेहमीपेक्षा दीड महिना जास्त पाऊस झाला. तसेच वातावरण बदल, ढगाळ वातावरण या बदलांमुळे आंब्याच्या झाडांना उशिराने आलेला मोहर याचा परिणाम आंबा हंगाम लांबला आहे.

त्यामुळे आंबे तयार होण्यास जून महिना उजाडणार असल्याचा अंदाज बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा काही झाडांना उशिराने मोहर आला असला, तरी पाहिजे त्या प्रमाणात मोहर आला नाही. अनेक झाडांना मोहरच आला नाही, तर थोड्या फार प्रमाणात झाडांना मोहर आला आहे. तोही ढगाळ वातावरणामुळे गळून जात आहे. उशिराने आलेल्या मोहरामुळे आंबा हंगामा लांबणार आहे.
बबन सांबरे, आंबा उत्पादक शेतकरी, विक्रमगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT