Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसाचा पिकांना फटका सोबत मशागतीतही व्यत्यय

Unseasonal Rain : मराठवाड्यात थांबून थांबून बरसणाऱ्या अवकाळी पावसाने पिकांना फटका बसला आहे. सोबतच खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामातही व्यत्यय निर्माण केला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात थांबून थांबून बरसणाऱ्या अवकाळी पावसाने पिकांना फटका बसला आहे. सोबतच खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामातही व्यत्यय निर्माण केला आहे.

आता बरसणारा पाऊस पावसाळ्यात वेळेवर व अपेक्षित बरसेल की नाही, खंडाचे व्यक्‍त केले जाणारे अंदाज व जाणकार शेतकऱ्यांच्या अनुभवातूनही व्यक्‍त होणारे खंडाचे कथन यामुळे आधीचा खरीप, रब्बी व आता उन्हाळी हंगाम हातचा जाण्याच्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या खरिपाची चिंता लागली आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वहीतीखालील ५४ लाख ७६ हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी खरिपाचे क्षेत्र ४७ लाख ८७ हजार हेक्‍टर आहे. येत्या खरीप हंगामासाठी ४८ लाख ४० हजार हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

त्यामध्ये कपाशी १३ लाख ९१ हजार हेक्‍टर, सोयाबीन २४ लाख ८६ हजार हेक्‍टर, तूर ४ लाख ४४ हजार हेक्‍टर, मका २ लाख ३१ हजार हेक्‍टर प्रस्तावित करण्यात आली आहे. एकीकडे कृषी विभागाचे व शेतकऱ्यांचे हंगाम नियोजन सुरू आहे दुसरीकडे अवकाळी पावसाचा जोर मराठवाड्यात अजूनही कायम आहे.

सतत पडत असलेल्या पावसामुळे भारी जमिनीत वाफसा येण्यास विलंब होतो आहे. त्यामुळे खरीप हंगामपूर्व मशागतीची कामांमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. येत्या २४ मे पासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ होणार आहे. यापूर्वी आपल्या जमिनीची मशागतीची कामे उरकून खरिपासाठी जमीन तयार ठेवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो.

शिवाय मराठवाड्यातील अनेक भागात दरवर्षी २५ मे नंतर धुळपेरणीलाही शेतकरी पसंती देत असतात. परंतु यंदा मशागतीचीच कामे अजून उरकली नाहीत. आता पुन्हा अवकाळीचा मुक्‍काम लांबल्यास मशागतीच्या कामात निर्माण झालेला व्यत्यय किती दिवस कायम राहतो यावरही बरेच काही अवलंबून आहे.

यंदा म्हणावी तशी जमिनीची धूप झालीच नाही. अवकाळी पावसाचा जोर कायम असल्याने वाफशाअभावी आमच्या भागात खरीप हंगामपूर्व मशागतीत व्यत्यय निर्माण झाला आहे. भारी जमिनीत वाफसा येण्यास चार ते पाच दिवस लागतील. त्यानंतरही पावसाने खोडा घातल्यास धूळ पेरणीचे नियोजन कोलमडेल.
मिठ्ठू चव्हाण, भांडेगाव ता. खुल्ताबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT