Ashadhi Wari Update Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari Update : आषाढी वारीसाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे

Wari Update : आषाढी वारीसाठी येणारा प्रत्येक वारकरी भाविक हा आपला पाहुणा असून, त्याचे आदरातिथ्य करणे ही आपली जबाबदारी आहे.

Team Agrowon

Solapur News : आषाढी वारीसाठी येणारा प्रत्येक वारकरी भाविक हा आपला पाहुणा असून, त्याचे आदरातिथ्य करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे वारीसाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, वीज, रस्ते यांसह आवश्यक सर्व दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवाव्यात.

त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घेत जबाबदारीने कार्यवाही करावी, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी केल्या.

आषाढी वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार सर्वश्री समाधान आवताडे, राजेंद्र राऊत आणि जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.

पुणे ते पंढरपूर वारी मार्गाची पाहणी करून येणाऱ्या मानाच्या पालख्या व दिंड्यांच्या व्यवस्थेची पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्याचे सांगून पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, यंदा वारी एक महिना आधी आली असल्याने उष्माघातासारखे प्रकार टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी सूक्ष्म नियोजन करावे.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा, तसेच वारी कालावधीत महिलांच्या सुविधांना प्राधान्य देऊन पालखी तळावर स्नानगृहाची व तंबूची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी, असे त्यांनी सूचित केले. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देताना चंद्रभागा नदीपात्रात येणाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी तरतूद केली जाईल.

जिल्हाधिकाऱ्यांकडून सादरीकरण

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पालखी तळावर, मार्गावर देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी माहिती दिली. यामध्ये आषाढी वारी कालावधीसाठी २५ हजार ५०० अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्यासाठी ४९ टँकर्स, ३० ठिकाणी गॅस वितरण व्यवस्था, २६ हजार १८२ शौचालयांची उपलब्धता, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, आरोग्य सुविधा आदि बाबतची माहिती श्री. ठोंबरे यांनी या वेळी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT