Onion  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Procurement : नाफेडच्या कांदा खरेदीत चौफेर भ्रष्टाचार

Onion Market : केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या ‘नाफेड’च्या कांदा खरेदीत चौफेर भ्रष्टाचार झाला आहे. ‘नाफेड’कडे स्वतःच्या कांदा चाळी आहेत; मात्र त्यात एक कांदाही नाही.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या ‘नाफेड’च्या कांदा खरेदीत चौफेर भ्रष्टाचार झाला आहे. ‘नाफेड’कडे स्वतःच्या कांदा चाळी आहेत; मात्र त्यात एक कांदाही नाही. या बनावट खरेदीमध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. ‘नाफेड’ची कांदा खरेदी म्हणजे भ्रष्टाचार करण्यासाठीच आहे, या शब्दात आमदार बच्चू कडू यांनी निशाणा साधत संताप व्यक्त केला.

बुधवारी (ता. १८) बच्चू कडू हे प्रहार पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. त्या वेळी लासलगाव येथील ‘नाफेड’ने उभारलेल्या कांदा चाळींची पाहणी केली. येथील कामकाज पाहून ते संतापल्याचे पाहायला मिळाले.

या वेळी प्रहार शेतकरी प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर आदी उपस्थित होते.

कडू म्हणाले, की नाफेड खरेदीत ग्राहक, शेतकरी व नाफेडच्या पातळीवर साठवणुकीतही भ्रष्टाचार आहे. हा चौफेर भ्रष्टाचार आहे. नाफेडच्या अधिकाऱ्यांनी यात प्रचंड पैसे खाल्ले. त्यांची चौकशी व्हावी. ज्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला. त्यांचे जबाब तलाठी किंवा कृषी सेवकांमार्फत घ्यावेत. त्याची यादी आपल्याकडे आहे. त्याची तपासणी करून घ्यावी. हा दोन ते तीन दिवसांचा प्रश्न आहे तो निकाली निघू शकतो, अशी मागणी त्यांनी केली.

पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या

कांदा मार्केटमध्ये विकला असेल तर कोणाच्या माध्यमातून विकला, कसा विकला त्याची स्पष्टता नाही. सरकारला फक्त योजना भ्रष्टाचार करण्यासाठीच करायची आहे का? या मोठ्या गोदामात एक कांदा सुद्धा पाहायला मिळत नाही. ही टाळूवरची लोणी खाणारी जमात आहे. त्याचे मंत्री पीयूष गोयल आहेत आणि ते महाराष्ट्रातून निवडून गेले आहेत.

त्यांना मी एकेरी भाषेत बोलतोय. त्यांनी लगेच लक्ष घालावे, नाहीतर त्याच्या गाडीवर कांदा फेकल्याशिवाय राहणार नाही. तूर, सोयाबीन अशा शेतीमालाची खरेदी होते. नाफेडने स्वतःच्या गोदामात किंवा बाजार समितीमध्ये खरेदी करावी. मात्र ही हरामखोरी फक्त भ्रष्टाचारासाठी झालेली आहे. पीयूष गोयल यांनी लक्ष घातले नाही तर आमचे आंदोलन नक्की, या शब्दात कडू यांनी थेट पीयूष गोयल यांना थेट इशारा दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT