Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : अकोट तालुक्यामध्ये पावसाचा फटका

Team Agrowon

Akola News : तालुक्यामध्ये मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर ओसरला असला तरी या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिसरात खरिपातील पिकांसोबत रब्बीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाचा संत्रा, कपाशी, तूर तसेच रब्बी पिकांना फटका बसला. पावसासोबतच आता मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

नोव्हेंबरमध्ये अकोट मंडलात १७.८ मिमी, मुंडगाव २७.८, पणज ६२.८ , चोहोट्टा ७३.२, कुटासा ७३.२, आसेगाव ५५.३, उमरा ३७.६, अकोलखेड ६२.८ अशी पावसाची नोंद झालेली आहे.

यामध्ये अकोलखेड, पणज आणि उमरा या महसूल मंडलांमध्ये सर्वाधिक संत्रा बागा आहेत. सध्या नुकसान समोर आलेले नसले तरी येत्या काळात या अवकाळीचे दुष्परिणाम बघायला मिळणार आहेत.

सध्या असलेल्या मृगबहाराच्या फळांची गळती आणि आता असलेल्या आंबिया बहाराच्या संत्रा बागा ताण अवस्थेतील नियोजन चुकल्यामुळे त्याचा परिणाम बहर फुटीवर निश्‍चित होऊ शकतो.

शासनाच्या नवीन नैसर्गिक आपत्ती कायद्याच्या नियमावलीनुसार एका आठवड्यात सतत पडणारा पाऊस हा अतिवृष्टी समजला जाईल. असे असताना शासनाने तत्काळ याची दखल घेत बागायतदार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आंबिया व मृग बहाराचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत द्यावी.
- शशिकांत गयधर, संत्रा उत्पादक शेतकरी, वस्तापूर, ता. अकोट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT