Midday Meal Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Midday Meal : शालेय पोषण आहारात अंड्यांच्या समावेशाविरुद्ध अकोल्यात मोर्चा

Midday Meal Protest in Akola : शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारात अंडी देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असून, याला विरोध दर्शवित गुरुवारी (ता. १४) अकोल्यात विविध संघटनांनी मोर्चा काढला.

Team Agrowon

Akola News : शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारात अंडी देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असून, याला विरोध दर्शवित गुरुवारी (ता. १४) अकोल्यात विविध संघटनांनी मोर्चा काढला. भारताच्या संस्कृतीची एक ओळख नष्ट करीत पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या आधारे मांसवादाची पिढी निर्माण करण्याचा कट सुरू असल्याचा दावा मोर्चेकऱ्यांनी केला.

अन्नातून अंडे खाऊ घालण्याचा निर्णय सरकारने घेत ही भोजन पद्धती महाराष्ट्राच्या शाळांत सुरू करण्याचा घाट सरकारने बांधला आहे. ब्राम्हण, माहेश्‍वरी, बहुसंख्य हिंदू, जैन महानुभवपंथी, अग्रवाल समाज हा शाकाहारप्रणीत समाज आहे. त्यांच्या मुलांना मांसाहारी बनविण्याचे पातक सरकार करीत आहे, असे या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संस्कृती रक्षा मंचाने सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर शाकाहारी समाज आंदोलन करणार आहे. या विरोधात याचिका दाखल करण्यापूर्वी सरकारने या बाबतीत निर्णय मागे घेणे आवश्यक आहे.

केवळ काही अंडी उपादकांच्या सोईसाठी सर्व समाज मांसाहारी करण्याचा सरकारचा निर्णय योग्य नाही. शाकाहार ही जीवनाची सर्वश्रेष्ठ जीवन पद्धती असून ती मोडीत काढण्याचा सरकारचा तुघलकी निर्णय नागरिक म्हणून मान्य करणार नाही.

शाकाहार संस्कृतीला संपविण्याच्या या निर्णयाने सरकार शेवटी काय मिळवणार आहे, असा प्रश्‍नही संस्कृती रक्षा मंचाने केला आहे. सरकारने या बाबतीत सुधारित निर्णय लवकरात लवकर घेण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात विविध समाज, संघटनांचे प्रतिनिधी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT