Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Akola : अकोला कृषी विभागास मिळाले विभागप्रमुख

अकोला जिल्ह्याच्या कृषी विभागाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रमुख अधिकारी नसल्याने प्रभारींकडून कारभार चालवला जात होता.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्याच्या कृषी विभागाला (Agriculture Department In Akola ) गेल्या अनेक महिन्यांपासून प्रमुख अधिकारी नसल्याने प्रभारींकडून कारभार चालवला जात होता.

बुधवारी (ता. ५) शासनाने केलेल्या पदोन्नतीच्या आदेशात अकोल्याला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (District Superintendent Agriculture Officer) तसेच आत्माला पूर्णवेळ संचालक मिळाले आहेत.

अकोला जिल्हा अधीक्षक पदावरून मोहन वाघ यांनी बदली झाल्यानंतर हे पद गेले अडीच वर्षे प्रभारी होते. या दरम्यान जिल्ह्याचा कारभार सातत्याने राज्यभर गाजला होता. पदभार देण्यावरूनही बरेच नाट्य झाले.

अखेरीस जिल्हा कृषी विकास अधिकारी असलेले डॉ. मुरली इंगळे यांच्याकडे पदभार आला. आता डॉ. इंगळे यांची पदोन्नती झाली असून त्यांना अकोल्यातच आत्माचे प्रकल्प संचालक म्हणून बढती मिळाली आहे.

सध्याचे प्रभारी अधिकारी आरीफ शाह यांनी या विभागाची घडी बसविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्यांच्याकडे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनची मूळ जबाबदारी असल्याने आत्माचा प्रभार सांभाळताना ओढाताण व्हायची.

आत्मा यंत्रणेला डॉ. इंगळे हे आता पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने त्यांना कारभार सुधारतानाच योजनांना गती देण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल. अकोल्यात रिक्त झालेल्या अधीक्षक कृषी अधिकारी पदावर नगरचे कृषी अधिकारी शंकर सोमनाथ किरवे हे पदोन्नतीवर नेमण्यात आले आहेत. ते लवकरच रुजू होणार असल्याचे सांगितले जाते.

बुलडाणा जिल्ह्यातील प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांची यवतमाळ जिल्ह्यात आत्मा प्रकल्प संचालक म्हणून बढती झाली आहे. आता बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून राजगुरुनगर (जि.पुणे) चे उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार दत्तात्रेय ढगे यांची पदोन्नती झाली आहे.

यापूर्वी ढगे यांनी बुलडाणा जिल्ह्यात काम केलेले असल्याने त्यांना पूर्वानुभवाचा फायदा होईल.

बुलडाणा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनाही पदोन्नती मिळाली असून त्या आता वाशीमच्या आत्मा प्रकल्प संचालक म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत.

अकोला व बुलडाणा या दोन्ही जिल्हा परिषदांची कृषी विकास अधिकारी ही पदे सध्या रिक्त आहेत. येत्या काळात होणाऱ्या पदोन्नत्यांमध्ये ही पदे भरली जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Processing Industry Development: फळप्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच नवीन योजना : केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा

Soybean Farming: खेडच्या पूर्व भागामध्ये सोयाबीनला नवसंजीवनी

Kharif Season Crisis: पिके तहानली; उपसाबंदीने शेतकऱ्यांची कोंडी

Agriculture Department Staffing Plan: कृषी विभागाचा आकृतिबंध अखेर रद्द

Flower Farmers Struggle: फुलबाजारातील शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवा

SCROLL FOR NEXT