Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : टंचाईग्रस्त वाड्या, वस्त्यांवर तत्काळ पाणीपुरवठा उपलब्ध करा

Ajit Pawar : गतवर्षी जिल्ह्यात मुबलक पाऊस पडला होता. यंदाही चांगला पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Team Agrowon

Parbhani News : ‘‘जिल्ह्यात उन्हाळ्यात चारापाण्याची अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. वाडी, वस्ती-तांड्यांवर मागणी आल्यास तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावेत,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपविभागीय अधिकारी-तहसीलदारांना शनिवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार विक्रम काळे, आमदार सर्वश्री डॉ. राहुल पाटील, रत्नाकर गुट्‌टे, राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले की, गतवर्षी जिल्ह्यात मुबलक पाऊस पडला होता. यंदाही चांगला पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.पाऊस पडेपर्यंत एप्रिल, मे या महिन्यात पाणीपट्टी थकबाकी वसुली करताना नागरिकांना जास्त ताण न देता पिण्याचे पाणी देण्यास प्राधान्य द्यावे.

ॲग्रीस्टॅक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी लक्ष द्यावे. गाव नमुना -८ प्रमाणे अतिक्रमणामुळे बंद झालेले पाणंद रस्ते, शेतरस्ते, शिवार रस्ते मोकळे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत.मात्र, पात्र लाडक्या बहिणींनाच हा निधी मिळेल याची दक्षता घ्यावी.जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा गैरवापर झाल्यास खपवून घेतले जाणार नाही. पायाभूत सोयीसुविधा निर्माण करताना त्यांचा दर्जा राखावा असे निर्देश पवार यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT