Sugarcane AI  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane AI : ऊस पिकातील एआयसाठी हेक्टरी २५ हजार रुपये देणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

AI In Maharashtra : ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये कर्ज देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोमवारी (ता.९) केली आहे

Dhananjay Sanap

AI In Agriculture : ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये कर्ज देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोमवारी (ता.९) केली आहे. परंतु कर्जाची वेळेत परतफेड केली नाही, तर १२ टक्के व्याज आकरण्यात येईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री पवारांनी दिली आहे. ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी अजित पवारांनी ठिबक ऊसासाठी १० हजार बिनव्याजी कर्ज देणार असल्याचं सांगितलं. "ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी हेक्टरी २५ हजार रुपये देणार आहोत. त्यामध्ये ठिबकवर ऊस असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी हेक्टरी १० हजार रुपये बिनव्याजी कर्ज देणार आहोत. ९ हजार रुपये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि उर्वरित रक्कम कारखाना देईल." असंही पवार म्हणाले.

राज्यातील ऊस शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी ६ टक्के व्याजदराने राज्य सहकारी बँक ५०० कोटी रुपये साखर कारखान्यांना देणार असल्याचं महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितलं. त्यावर या निधीचा वापर कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी वापरा अन्यथा कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.

तसेच कृषी विद्यापीठांनी शंभर एकरवर ऊस बेणे प्लॉट एआयवर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची सूचना अजित पवारांनी केली. तर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एआयसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्याचा आजच शासन निर्णय काढणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, ऊस शेतीत एआयला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी धोरण निर्मिती सुरू आहे. अलीकडेच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी कर्जपुरवठा करण्याची माहिती दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT