AI In Sugarcane Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

AI In Sugarcane Farming : ‘एआय’ तंत्राने ऊस उत्पादनावाढ शक्य

Agriculture Technology : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस पिकांमधील ६० ते ७० टक्के पाण्याची बचत करता येते, आवश्यक त्या अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे खतांवरील खर्च कमी होतो, तसेच मजुरांवर असलेले अवलंबन कमी करता येणे भविष्यामध्ये शक्य आहे

Team Agrowon

Solapur News : ‘एआय’चा वापर करून कमी पाण्यामध्ये, कमी मनुष्यबळासह योग्य व्यवस्थापनाद्वारे उसाचे एकरी शंभर टन उत्पादन घेता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत अक्कलकोट तालुकयातील मोटयाळ गावी आयोजित कार्यक्रमांमध्ये डॉ. तांबडे बोलत होते. या कार्यक्रमास एस. पी. लोखंडे, मंडळ कृषी अधिकारी अक्कलकोट, प्राध्यापक डॉ. आदिनाथ ताकटे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे शास्त्रज्ञा डॉ. नम्रता गिरी, डॉ. रूपा स्वजय, विनोद पवार आदीं उपस्थित होते.

डॉ. तांबडे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस पिकांमधील ६० ते ७० टक्के पाण्याची बचत करता येते, आवश्यक त्या अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे खतांवरील खर्च कमी होतो, तसेच मजुरांवर असलेले अवलंबन कमी करता येणे भविष्यामध्ये शक्य आहे भविष्यातील शेती ही एआय सुसंगत असेल, अशी माहिती दिली.

कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने हे अभियान तीन टीमच्या मदतीने एकाच वेळी जिल्ह्यातील दोन तालुक्यांमध्ये म्हणजेच अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये राबवले जात आहे. यावेळी मोटयाळमधील शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी एस.. पी. लोखंडे यांनी दिली.

त्यामध्ये त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, पीक विमा, ठिबक सिंचन फळबाग लागवड आदी योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. ताकटे यांनी मृदा आरोग्य आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञां डॉ.गिरी यांनी कृषी प्रक्रिया व डाळिंब उपपदार्थ निर्मितीबाबत सविस्तर माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT