Nagar Fodder News Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Fodder News : अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला चाऱ्यावरून आदेश

Fodder Transport : राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळाचे चटके बसत आहेत. यादरम्यान अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी चारा वाहतुकीवरून आदेश दिले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Ahmednagar News : राज्यात अनेक जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे पाण्याची टंचाईसह चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यादरम्यान अहमदनगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्यावरून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी इतर जिल्ह्यात चारा वाहतुक करण्यास मनाई केली आहे. तसेच यासाठी त्यांनी थेट आदेश काढत मुरघास, आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) वाहतुकीवर बंदी घातली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे येथे पाण्यासह चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान येथे दुष्काळाचेही सावड आहे. याचपार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू केले आहे. तसेच काढलेला आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू असणार आहे.

दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे ४२ ठिकाणी शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. येथे गेल्या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. ज्यामुळे येथे चारा टंचाईला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागेल अशी स्थिती आहे. यामुळे या स्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा जिल्ह्यातच राहावा अशी तजवीज जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी सालीमठ यांनी काढलेल्या या आदेशामुळे आता जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT