Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Linking : अहिल्यानगरमध्ये खतांच्या लिंकिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Fertilizer Use : शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके विकताना त्याबरोबरच अन्य गरज नसलेल्या खत, कीटकनाशकांची बळजबरीने विक्री करत लिंकिंग केल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात सुरूच आहे.

Team Agrowon

Rabbi Season : अहिल्यानगर ः शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके विकताना त्याबरोबरच अन्य गरज नसलेल्या खत, कीटकनाशकांची बळजबरीने विक्री करत लिंकिंग केल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात सुरूच आहे. नेवासा येथे निविष्ठा विक्रेत्यांनी तहसीलदारांकडे याबाबत थेट तक्रार केल्याने मध्यंतरी काही दिवस शांत असलेला ल्या लिंकिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळत आहे.

रब्बी हंगामात खते, कीटकनाशके खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना लिंकिंगमुळे शेतकरी मात्र त्रस्त आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून खताची लिंकिंग सुरू आहे. अनेक वेळा बैठका घेतल्या, खत कंपन्यांना समजही दिली, मात्र हे प्रकार थांबायला तयार नाहीत.

कार्यक्षेत्राने मोठा असलेल्या आणि खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे मोठे क्षेत्र असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या रब्बी हंगाम चालू असल्यामुळे खताची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र खत कंपन्या खतांसोबत लिंकिंगची सक्ती करत आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतांसमवेत इतर अनावश्यक खते, औषधे दिली जात आहे. सदर खते, औषधांची आवश्यकता नसतानाही खत दुकानदारांना खरेदी करण्याची सक्ती कंपन्याकडून केली जात आहे.एखाद्या खत विक्रेत्याने अनावश्यक खते, औषधे घेण्यास नकार दिल्यास संबंधित दुकानदारास आवश्यक तो खतपुरवठा केला जात नाही.

जाणीवपूर्वक त्यांची अडवणूक केली जाते. त्यामुळे त्यांना ते घ्यावे लागते. खत दुकानदार ते खते, औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. खत कंपन्यांकडून होत असलेल्या लिंकिंग सक्तीला आळा घालण्यासाठी खत पुरवठादार असोसिएशनच्या यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठका झाल्या आहेत. केंद्र सरकारने संबंधित कंपन्यांना पत्रव्यवहार करून लिंकिंग न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही त्यांच्याकडून लिंकिंग केले जात असून सर्रास लिंकिंगचा प्रकार सुरू आहेत. काही कंपन्याकडून तर वाहतुक भाडेही अधिक वसूल केले जात आहे. त्यामुळे विक्रेतही शेतकऱ्यांना अधिक दराने विक्री करतात. निविष्ठांचा चढ्या दराने विक्री केल्यावर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने विक्रेतेही त्रस्त झाले आहेत.

नेवाशात विक्रेत्यांची तक्रार
नेवासे येथे कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दोन दिवसांपूर्वी खत लिकिंगच्या बाबतीत थेट तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. रासायनिक खताच्या प्रत्येक ग्रेडसोबत लिकिंग केली जात आहे. आम्हाला शेतकऱ्यांना मात्र अधिक दराने विक्री करणे शक्य नाही. त्यामुळे २५ जानेवारी २०२५ पर्यंत लिंकिंग पूर्णपणे बंद करावी. अन्यथा २६ जानेवारी रोजी सर्व विक्रेते आपले निविष्ठा विक्री परवाने तहसील कार्यालयात जमा करण्याचा इशारा देत तालुका कृषी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे. जर निविष्ठा विक्रेत्यांना अशा इशारा देण्याची वेळ येते तर नेवासा तालुका कृषी विभाग काय करतो. त्यांना ही लिंकिंग माहिती नाही का, त्यांनी यापूर्वी याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आयुक्तस्तरावर का कळवले नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  

शेतकऱ्यांना खते, बियाणे विक्री करताना त्यासमवेत कोणत्याही खताची लिंकिंग करण्याचा अधिकार खत कंपन्यांना नाही. आवश्यक खतासमवेत इतर अनावश्यक खते, औषधे लिंकिंग केल्याचा ठोस पुरावा मिळाला तर सबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासंदर्भात कृषी विभागाकडून प्रस्ताव वरिष्ठ आयुक्तांकडे पाठवला जाईल. खताचे लिंकिग होत असल्यास ठोस पुराव्यासह आमच्याकडे तक्रार करावी.  
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT