Agrowon Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Exhibition : मराठवाड्यात होणार कृषी ज्ञानाचा जागर

Agriculture Exhibition : दुष्काळ आणि प्रतिकूल स्थितीतदेखील शेती फुलवण्याची परंपरा लाभलेल्या मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी ज्ञानाचा महाजागर ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या ‘अॅग्री एक्स्पो-२०२४’ कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून घडवून आणणार आहे.

Team Agrowon

Pune News : दुष्काळ आणि प्रतिकूल स्थितीतदेखील शेती फुलवण्याची परंपरा लाभलेल्या मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी ज्ञानाचा महाजागर ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या ‘अॅग्री एक्स्पो-२०२४’ कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून घडवून आणणार आहे.

छत्रपती संभाजीनगरात ११ जानेवारीपासून सुरु होत असलेल्या या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने खळखळून वाहणाऱ्या ज्ञानगंगेला आपल्या शेतशिवारापर्यंत नेण्यासाठी हजारो भगीरथ शेतकरी कमालीचे उत्सुक झालेले आहेत.

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक जी.के.एनर्जी सोलर पंप हे आहेत. कृषी विभाग-महाराष्ट्र राज्य व आत्मा विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच इकोजेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स बी. जी. चितळे डेअरी (भिलवडी, सांगली), इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) यांच्या सौजन्याने हे प्रदर्शन होते आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवरील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर (केंब्रिज स्कूलजवळ) ११ ते १४ जानेवारी दरम्यान येथे असलेल्या या प्रदर्शनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

दुष्काळी स्थितीमुळे उद्भवत असलेल्या समस्यांवर शास्त्रशुद्ध तंत्राद्वारे कशी मात करायची, नव्या शेती पद्धती, आधुनिक वाण व यंत्र-उपकरणांच्या वापरातून शेतीला कसे फुलवायचे याविषयी तज्ज्ञांकडून चर्चासत्रांमध्ये माहिती मिळणार आहे. पाणी टंचाईच्या काळातील फळबागांचे व्यवस्थापन, दुष्काळी स्थितीला सहनशील पिके तसेच आर्थिक स्थैर्य देणाऱ्या रेशीमशेतीबाबत अभ्यासक व शास्त्रज्ञांसोबत प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवाद साधता येणार आहे.

लढा दुष्काळाशी...

दुष्काळ व पाणी टंचाईवर मात करीत यशस्वीपणे नफेशीर शेती केलेल्या शेतकऱ्यांच्या यशकथा प्रदर्शनातील स्वतंत्र दालनात मांडल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांनी या दालनाला भेट देत बारकाईने माहिती घ्यावी, तज्ज्ञांकडून सल्ला घेत आपल्या शेतशिवारात प्रयोग करावेत, असा हेतू यशकथा दालनाचा असेल.

ट्रॅक्टर जिंकण्याची संधी..

अॅग्रोवनच्या प्रदर्शनात ‘लकी ड्रा’द्वारे ट्रॅक्टर भेट दिला जाणार आहे. त्याविषयी आतापासून गावशिवारात चर्चा आहे. प्रदर्शनस्थळी आल्यानंतर नोंदणी अर्ज भरून देणारे सर्व शेतकरी या ‘लकी ड्रॉ’साठी पात्र असतील. त्यामुळे प्रदर्शनस्थळी येताच प्रत्येक शेतकऱ्याने नोंदणीत माहिती, भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करावा.

शेजारच्या ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये नोंदणी अर्ज टाकावा. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी (ता.१४) दुपारी तीन वाजता निघणाऱ्या या ‘लकी ड्रॉ’तील ट्रॅक्टर कोणाच्या शेतात जातो याची उत्सुकता आतापासून शेतकऱ्यांना लागलेली आहे.

राज्यातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) आव्हानात्मक वाटचालीत उत्तम काम करीत आहेत. एफपीसींच्या या उपक्रमांना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अॅग्रोवनच्या प्रदर्शनात स्वतंत्र स्टॉल्स देण्यात आले आहेत. याशिवाय ट्रॅक्टर, पीक काढणी व कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्डस्टोअर उद्योग, टिश्यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन प्रणाली, तसेच बियाणे, खते, कीटकनाशके, हरितगृह उभारणी, यंत्रे व अवजारे क्षेत्रातील नामांकित कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, नामवंत बॅंका, कृषी शिक्षण संस्थांदेखील या प्रदर्शनात आपआपल्या योजना व उपक्रम समजावून सांगणार आहेत.

प्रदर्शनातील चर्चासत्रांचे विषय

गुरुवार (ता. ११ )

विषय : रेशीम शेतीमधील आर्थिक संधी

वेळ : २ ते ४

तज्ज्ञ :

१) महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम विभाग, महाराष्ट्र राज्य

२) बी.डी.डेंगळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

३) अजय मोहिते, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना

४) दिलीप हाके, माजी उपसंचालक, रेशीम विभाग

५) प्रयोगशील शेतकरी सदाशिव गिते,देवगाव,ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर

६) प्रयोगशील शेतकरी सिद्धेश्वर भानुसे, बोरगाव, ता. घनसावंगी, जि.जालना

शुक्रवार (ता.१२)

विषय : लढा दुष्काळाशी...

वेळ : २ ते ४

तज्ज्ञ :

१) पंडित वासरे, कृषी अभियंता, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि.जालना

२) प्रयोगशील शेतकरी प्रल्हाद गवारे, चिंचवडगाव, ता.वडवणी, जि.बीड

३) प्रयोगशील शेतकरी राजेंद्र देशमुख, बार्शी, जि.सोलापूर

शनिवारी (ता.१३)

विषय : फळबागांचे व्यवस्थापन

वेळ : २ ते ४

तज्ज्ञ :

१) डॉ.संजय पाटील, प्रभारी अधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि.जालना

२) डॉ. एस.बी.पवार, सहयोगी संचालक, संशोधन, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर

३) प्रयोगशील शेतकरी मंगेश देशमुख (पेडगाव, ता. जि.परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT